सामाजिक

समृद्धी महामार्गाच्या अपघाताची झळ सगळ्यात जास्त वर्धा जिल्ह्याला

Spread the love
वर्धे सह जिल्ह्यातील अन्य ठिकाण मिळून 12 लोकांचा समावेश 
वर्धा / विशेष प्रतिनिधी 
              समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजा जवळील  पिंपळगाव जवळ रात्री 2 वा. च्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स पलटल्याने ट्रॅव्हल्स ला लागलेल्या आगीत 25 प्रवाश्यांचा  होरपळून मृत्यू झाला आहे. यापैकी 12 प्रवाशी  वर्धा आणि जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघाताची झळ वर्धा जिल्ह्याला अधिक पोहचल्याचे एकंदरीत परिस्थिती वरून दिसुन येत आहे. जसजसा पोलिसांचा तपास पुढे पुढे सरकत आहे तसतसे चित्र आणखी स्पष्ट होत चालले आहे.
                         नागपूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स कॅग्या वाहनाला देउळगावराजा  नजीक पिपळगाव जवळ रात्री 2 च्या सुमारास अपघात घडला आहे. यात 33 प्रवासी असल्याचे समजत असुन त्यातील 25 प्रवाश्यांचा आगीत होरपळुन मृत्यू झाला आहे.  ट्रॅव्हल्स पलटी होऊन त्याची डिझेल टॅंक फुटल्याने आग भडकली.  आणि झोपेत असलेल्या प्रवाश्यांना काही कळण्याच्या आत ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जे प्रवाशी वाचले त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःला वाचविण्यात यश मिळवले असे त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमावरून लक्षात येते.
सगळ्यात जास्त झळ वर्धा जिल्ह्याला –  या अपघातात मरण पावलेल्या 25 प्रवाश्यां पैकी 12 प्रवाशी हे वर्धा जिल्ह्यातील आहेत. यापैकी एक आर्वी ,एक हिंगणघाट एक सेलू आणि एक धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव मंगरूळ येथील व हल्ली आर्वी ला निवास असलेल्या तरुणीचा समावेश आहे.
वर्धा आणि  आर्वी तालुक्यातील कन्नमवार गावातील महिलेचा समावेश – कारंजा तालुक्यातील कन्नमवार ग्राम येथील निवृत्त शिक्षकांची पत्नी असलेल्या राजश्री गांडोळे या आर्वीतील करीम नगरच्या रहिवासी असून त्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करीत होत्या. त्यांचा मुलगा पुण्याला नोकरीला असल्याने त्यांचे व पतीचे पुण्याला नेहमी येणे -जाणे असायचे. त्या दि.30 ला आर्वीवरून वर्धा मार्गे पुण्याला जाण्यासाठी निघाल्या व मुलाला फोन करून त्या पुण्यासाठी निघाल्याचा निरोप भ्रमणध्वनी वरून दिला. हेच त्यांचे अखेरचे बोलणे ठरले. दुसऱ्या दिवशी पुण्याला ट्रॅव्हल्सने पोहचण्याची वाट बघत असताना वाटेतच ट्रॅव्हल्स ने पेट घेतल्याने त्यांचा घात झाला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर  व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
                या दुर्दैवी घटनेत मृत पावलेली कु. राधिका महेश खडसे ही मूळची धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव मंगरूळ येथील असून हल्ली ती वर्धा हेठे राहत होती..
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close