
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सध्या थंडीचा कडाका वाढला आहे त्यात घाटंजीतील वाघाडी नदीपात्रात शनिमंदिरा जवळ संभाशिव ईस्तारी वहीले नामक ईसम वय 62 वर्ष दी. 17 ला सकाळी नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता.पाण्यात उतरताच नदीचे पानी खुप थंड असल्या कारणाने म्हाताऱ्याचे शरीर संपूर्ण पणे अकडल्या गेल्याने म्हातार्याच्या शरीराची हालचाल बंद होऊन तो पाण्याचे थडीवर पडला.मनुष्य शरीर पाण्यावर तरंगत असल्याचे लोकांना आढळून आले त्यात काही जागृकांनी नदीपात्रात मृतदेह असल्याची माहीती घाटंजी पोलीस स्टेशन ला कळविली ही माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय नागरगोसे ,जमादार प्रविण तालपोपुलवार,जमादार धाबेकर, जमादार गोहणे,आणी नगर परिषद चे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत म्हाताऱ्याला पाण्याच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी म्हातारा जिवंत असून फक्त बेशुद्ध असल्याचे सांगून लगेच उपचार करून शुध्दिवर आणून जीवदान दिले. पोलिसांच्या व का इ जागरुकामुळे एका नागरिकांचे प्राण वाचले. म्हणतात ना ‘देव तारी त्यास कोण मारी’ यांची प्रचिती या प्रकरणात आली.पोलिसाच्या या तत्परतेमुळे घाटंजीची जनता पोलीसांचे कौतुक करीत आहेत.