वाडी राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय युवा संघर्ष यात्रेची जाहीर सभा!
बेरोजगार युवकांना हाताला काम व उत्तम आरोग्य देण्याची जबाबदारी कुणाची? आ. रोहित दादा पवार. *भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चिंता!
वाडीत साधा शासकीय दवाखाना ही भाजपचे आमदार देऊ शकले नाही ही शोकांतिका!
वाडी (प्रतिनिधी )
पुणे ते नागपूर 800 किलोमीटर ची युवा संघर्ष यात्रेचे काल वाडित 4 वाजता आगमन झाले. दत्तवाडी वळणावर या संघर्ष यात्रेचे वाडीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी जोशात फटाके फोडून ,ढोल ताशा सह स्वागत केले .यानंतर ही संघर्ष यात्रा वाडीतील विविध नगरातून घोषणा देत टेकडी वाडी या ठिकाणी पोहचली.या ठिकाणी जाहीर सभेसाठी आकर्षक स्टेज सजवण्यात आला होता. या ठिकाणी मंचकावर उपस्थित आमदार रोहित दादा पवार,-रोहित पाटील, माजी मंत्री रमेशचंद्र बंग ,माजी आमदार विजय घोडमारे या सर्व मान्यवरांची वाडी राष्ट्रवादी तर्फे स्वागत करण्यात आले. प्रस्तावना श्याम मंडपे यांनी केली त्यानंतर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी वाडी, हिंगणा एमआयडीसी, च्या परिस्थिती ,प्रलंबित समस्या कथन करून शिक्षित युवक, कामगार ,अतिशय त्रस्त असल्याचे सांगितले.
यानंतर संघर्ष यात्रेतील प्रमुख सदस्य रोहित पाटील यांनी ही संघर्ष यात्रा काढण्याचे उद्देश स्पष्ट करून राज्यातील त्रस्त असलेल्या युवक, शिक्षित, बेरोजगार ,शेतकरी यांचे मत जाणून घेऊन याची कारणे जवळ जाऊन समजून देण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढल्याचे सांगितले .
प्रमुख संघर्ष योद्धा आमदार रोहित दादा पवार यांनी महाराष्ट्रातून 800 किलोमीटरची यात्रा करताना आलेले अनेक अनुभव कथन केले. यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी ,विद्यार्थी, सुशिक्षित , बेरोजगार भाजप शासनाच्या कार्यपद्धतीने अत्यंत त्रस्त झाली असून शिक्षित असूनही हाताला काम नाही, आरोग्याच्या सोयी नाही, शेतीला भाव नाही या कडे लक्ष वेधून ही जबाबदारी ज्या भाजपकडे आहे ते मात्र समाजामध्ये धर्माच्या आधारावर तेढ निर्माण करण्यात मशगुल झालेले दिसून येत आहे. महाराष्ट्राचे भाजप नेते महाराष्ट्रातून लाखो करोडो चे प्रकल्प व गुंतवणूक गुजरात मध्ये जाताना मोठ्या नेत्याना खुश करण्यासाठी गप्प बसले आहेत. ते महाराष्ट्रातील जनतेला जबाबदार आहे की आपल्या गुजरातच्या नेत्याला? तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले ,छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजाचे समतचे विचार ज्या संविधानाने समस्त भारतीयांना दिले आहे ते संविधान बदलन्याचे षड्यंत्र व प्रयोग भाजप करीत असून,2024 नंतर विजयी झाल्यास नक्की ते हे करतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली.देशात व राज्यात सध्या विकासाऐवजी धार्मिक वाद निर्माण करायला प्राध्यान्य असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असूनही नागपूर आता क्राइम कॅपिटल झाल्याचे दिसून येत आहे. नागपूरच्या एमआयडीसी बुटीबोरी, मिहान यामध्ये एकही नवीन प्रकल्प न आल्याने व प्रकल्प बंद पडत असल्याने विदर्भातील शिक्षित युवकांना रोजगार कसा मिळणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी वाडी च्या विविध समस्या कडे केदेखील लक्ष वेधले. वाडी च्या एक लाख जनतेला मागील आठ वर्षापासून मंजूर असलेला शासकीय दवाखाना विद्यमान भाजप आमदार देऊ शकले नाही ही शोकांतिका आहे? रमेशचंद्र बंग यांना श्रेय जाईल या भीतीने त्यांनी हा दवाखाना वाडीत स्थापन करण्यास दुर्लक्ष केल्याचाही आरोप त्यांनी केला. वाडी ड्रेनेजची समस्या आणि डीपी प्लॅन देखील नागरिकांच्या हिताएवजी कुण्या राजकीय लोकांच्या हितासाठी तयार केला जात असल्याचाही नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगितले.ट्रान्सपोर्ट हब असून विकास नियोजन व सुविधा नाही. मग कसे वाढणार छोटे व्यवसाय व कसे मिळणार रोजगार?एकूणच वाडी सारखी स्थिती सम्पूर्ण राज्यात असून या सर्व सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी, व्यवससिक, यांच्या समस्या समजून घेऊन त्या सुटण्याच्या दृष्टीने युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.मात्र त्या साठी येणाऱ्या काळात जनतेने जागरूक होऊन भाजप सरकारचा संविधान बदलण्याचा आणि धार्मिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पडावा व समस्या निर्माण करणाऱ्या राज्यातील सरकार ला जाब विचारावा ,व सत्ता बदल घडवून आणला असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.संचालन माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले.
मंचकावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग, युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष राजापूरकर ,माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषद सदस्य गुड्डू बंग, सलील दादा देशमुख ,युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, माजी गटनेते राजेश जयस्वाल, प्रा. सुरेंद्र मोरे,शहर अध्यक्ष वसंत इखनकर ,माजी नगरसेवक श्याम मंडपे, हिम्मत गडेकर,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे ,दिलीप दोरखंडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष मधु माणके,संतोष केचे, सभापती उज्वलाताई बोराडे ,उद्योग व्यवसाय आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मोहन ठाकरे, देवराव अखंड ,अमित हुसनापुरे, सोनू चरडे ,उत्तम दास,शेषराव अखंड, जगदीश — विशाल लोणारे , हिम्मत गडेकर, विकास लवांडे, सुशीला मोरांडे, पूजा मोरे ,अनिकेत घरडे, भुरे खान ,विशाल लोणारे, पंकज मोहोळ, निशांत वाघमारे ,श्रावण काकडे, वासुदेव आवारे, नरेंद्र राऊत ,रोशन काकडे ,देवराव अखंड ,सचिन डोंगरे, अविनाश घोटेकर ,राजकुमार वानखेडे आयोजक अनिकेत घरडे उपस्थित होते.संचालन माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले.