वाडी न.प.च्या आर.ओ.प्लांट ला युवक काँग्रेसची श्रद्धांजली
वाडी(नागेश बोरकर): वाडी स्थित आदर्श नगर येथील नगर परिषदेने ५ वर्षांपूर्वी बसविलेले आर.ओ. प्लांट बंद अवस्थेत आहे.नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.अनेकदा नगरपरिषदेला याबाबत सूचना देऊनही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे रविवारी युवक काँग्रेस तर्फे या आर.ओ.प्लॉटला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अश्विन बैस यांचा नेतृत्वात गणेश बावणे,ईशान जंगले, गौरव लांडगे,हरीश कडव,राजू आंदे,सचिन मंडेकर,मंगेश बावणे,संजय आंदे,सूर्यभान चौधरी,अमित गेडाम,गोपाळ कलंबे इत्यादींनी आर.ओ.प्लांट ला माल्यार्पण करून श्रद्धांजली दिली.
यावेळी नगर परिषद “होश मे आओ,आर ओ प्लांट शुरु करो” अशी नारेबाजी करण्यात आली.५ वर्षा पासून बंद अवस्थेत असलेला आर ओ प्लांट तातडीने सुरू करावा.अशी मागणी येथील नागरिकांची आहे. परंतु नगरपरिषद याकडे सूचना देऊनही वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकात न.प. विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे.ही बाब लक्षात येताच आज युवक काँग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस यांनी या ठिकाणी येऊन नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी या आर.ओ.प्लांटला श्रद्धांजली अर्पण केली.या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने नागरिकात नगर परिषदेच्या उदासीनतेबाबत एकच चर्चा दिसून आली.