निवड / नियुक्ती / सुयश

कलाशिक्षक परमानंद तिराणीक राज्यस्तरीय “आदर्श डोळस शिक्षक” पुरस्काराने सन्मानित.

Spread the love

 

विदर्भातून एकमेव निवड

आतापर्यंत १०० च्या वर राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

ग्यानीवंत गेडाम
वरोरा -नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड युनिट महाराष्ट्र नाशिक तर्फे दिव्यांग दृष्टि बाधित शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या व समाजामध्ये शासन स्तरावर स्वयंसेवी संस्था माध्यमातून जे डोळस शिक्षक शिक्षणाचे कार्य करतात त्यांना राज्यस्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानित केले जाते. अंध व दिव्यांग संवर्गाचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून नवनवीन उपक्रमाची ओळख दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून जोड देऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व मोजक्याच शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून शेकडो शिक्षकाचे प्रस्ताव होते त्या सर्वांचे प्रेजेंटेशन जिल्हा माहिती कार्यालय अंतर्गत केल्यानंतर त्यातील नावीन्यपूर्ण प्रयोग केलेल्या शिक्षकांनी बाजी मारली. त्यात महाराष्ट्रातील एक प्राध्यापक तर चार शिक्षकांचीअतिशय पारदर्शकपणे निवड करण्यात आली. त्यात विदर्भातून एकमेव चंद्रपूर जिल्ह्यातील आनंद अंध विद्यालय आनंदवन येथील कलाशिक्षक परमानंद तीरानीक यांच्या निवडीने जिल्ह्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात महाराष्ट्राचे लाडके ज्ञानपीठ प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज तथा वि .वा. शिरवाडकर यांच्या जयंती पर्वा निमित्त तसेच नैब च्या २५व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पद्मश्री बाबुभाई राठी माईस सभागृह नाशिक येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांच्या शुभहस्ते परमानंद तीराणिक यांचा सह पत्नी रुक्मिणी तीराणिक शाल श्रीफळ, गुलाब पुष्प, सुवर्णपदक, सन्मान चिन्ह व मानपत्र आणि रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन राज्यस्तरीय आदर्श डोळस शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी रामेश्वर कलंजी अध्यक्ष नैब महाराष्ट्र आणि उपाध्यक्ष नैब इंडिया मुंबई मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, चेअरमन पुरस्कार समिती नाशिक, के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर डीन प्रा. डॉक्टर कुटे, गोपी मयूर तर प्रमुख अतिथी म्हणून सीईओ प्रा. डॉक्टर अश्विन कुमार भारद्वाज, संपत औधळे समिती सचिव, इतिहास संशोधक प्रा डॉक्टर अमिषा धुमटकर मुंबई, महाराष्ट्रातील पहिली दृष्टीबाधित जिल्हाधिकारी प्रांजल कोमल सिंग पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पुरस्कार वितरण सोहळा व तेजोमय प्रवास स्मरणिकातील पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या विशेष कार्य गौरवासाठी आदर्श ठरलेल्या प्राध्यापक शिक्षक व सेवा संस्था यांचा यशोचीत सन्मान प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close