क्राइम

‘ डब्ल्यू ‘ वरुन वाद दोघांचे जिवन बरबाद 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                       वाद कधी कोणाशी होईल आणि या वादाचे रूपांतर कधी हाणामारीत होईल याचा काहीच नेम राहिलेला नाही. एका शब्दांमुळे झालेल्या राड्यात सोन लोकांना जीव गमवावा लागला आहे.घटना अशोक विहार मध्ये ही घटना घडली आहे. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

         पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भलस्वा डेअरी परिसरातील निवासी  रघू, झाकीर आणि भुरा हे सोमवारी रात्री अशोक नगर येथे डब्लू नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले होते. त्याचा शोध घेत होते, पण तो सापडत नव्हता. तेव्हा त्यांनी तेथील एका स्थानिक इसमाला विचारले की डब्ल्यू कुठे राहतो ? मात्र त्याने सरळ उत्तर दिले नाही. उलट ‘ डब्लू नाही, डब्लू भाई म्हणायचं’, असं त्यांनाच सुनावलं. याच मुद्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळाने डब्लू हा देखील तिथे आला. दोन्ही पक्षांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. त्याच दरम्यान, रघूने डब्लूला गोळी घातली. हे पाहून डब्लूच्या साथीदारांनी रघूला गोळ्या घातल्या. यात रघूचा जागीच मृत्यू झाला. या गँगवॉरदरम्यान रघूचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.

मात्र काही अंतरावर गेल्यावर रघूचा एक साथीदार भुरा पकडला गेला आणि डब्लूच्या साथीदारांनी त्याची हत्या केली. तर, घटनास्थळावरून पळून गेलेला रघूचा साथीदार झाकीर याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत जखमी झालेला डब्लूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close