सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड यांच्या वतीने हिवरखेड शहरांमध्ये मतदान जनजागृती अभियान संपन्न-
बाळासाहेब नेरकर कडून
भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सव 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होणार आहे म्हणजेच महाराष्ट्र विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुका दर पाच वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होत असल्यास आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मग योग्य आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकेल अशा उमेदवारांची निवड होऊ शकत नाही हा विषय लक्षात घेऊन सेंट पॅlल अकॅडमी हिवरखेड येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी लोकनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदान आपण का केलं पाहिजे व ते किती आवश्यक आहे याविषयी जनजागृती केली त्यामधील काही महत्त्वाचे ठळक मुद्दे खालील प्रमाणे
*मतदानाचे महत्व*: मतदान हे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहे आणि देशाच्या भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी ते महत्वाचे आहे ¹.
– *मतदान केंद्रांवर सुविधा*: सर्व मतदान केंद्रांवर अडथळा विरहित वातारण, रॅम्पची सुविधा, तळ मजल्यावर मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रावर येण्या-जाण्यासाठी वाहन व्यवस्था .
– *मतदान जनजागृती घोषवाक्ये*: “मतदान करा, देश बदला”, “तुमचे मत, तुमचे भवितव्य” .
– *दिव्यांग मतदारांना सुविधा*: दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन-
– या अभियानांतर्गत गावातील प्रमुख चौकांमध्ये पथनाट्य व मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये नागरिकांनी स्वयंपूर्णतेने सहभाग घेऊन शाळेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मतदान जनजागृती सेल्फी कॉर्नर मध्ये आपले फोटो काढून लोकांना मतदानाचा आव्हान केला यावेळेस सेट पौल अकॅडमी हिवरखेडचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर, उप मुख्याध्यापिका निमित्तl गांधी मॅडम, नितीन कोल्हे सर, शशिकांत दहि सर, गौरव तिवारी सर, येलूकार मॅडम, पूजा बाजारे मॅडम, अनुप चांदणे, अतिक सर,चैतन्य खारोडे शेख सलमान व गावातील अनेक गणमान्य व्यक्तींची उपस्थिती या अभियानांतर्गत होती या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.