घाटंजीची जलवाहणी वाघाडी जलावाचून कोरडी

अनेक भागात पाणी अडविल्यामुळे शेतक-यांचे पाण्यावाचून मालाचे नूक्सान
घाटंजी तालुका प्रतिनिधि-
घाटंजीची जलवाहणी वाघाडी जलावाचून कोरडी पडली असून उन्हाची चाहूल लागणा-या मार्च सुरवातीलाच वाघाडीचे जलपात्र कोरडे फट्ट पडल्याचे विदारक दृष्य पहावयास मिळत आहे. आध्याप उन्हाळ्याचे तिन ते चार महीने बाकी असून उन्हाची दाहकता पाहीजे तसि नसतांना वाघाडी नदीचे जागोजागी स्वभल्यासाठी पाणी अडविल्यामूळे जलप्रवाह बंद झालेला असल्याने अनेक शेतकरी वर्गाच्या फल्ली,तिळ,गेहूं यासारख्या पिकाचे पाण्याअभावी तिन तेरा वाजले आहे. येत्या काळात असिच परिस्थिति राहील्यास पिंक पुरते नाही से होईल व नदीपात्रात पाणी नसल्याने जणावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे घाटंजी व आजुबाजुच्या गावाची जलवाहीणी बंद पडल्याने शेतकरी वर्गात मोठा रोष व्यक्त होत असून वाघाडी नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे वह वरिष्ठांणी या पाणी प्रश्नावर लक्ष्य द्यावे ही मागणी जनतेतून जोर धरत आहे.