शिवाजी हायस्कूल मोर्शी येथे विशाखा समिती सभा सम्पन्न
मोर्शी / ओंकार काळे
स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथे महिला व मुलींच्या सुरक्षेकरिता मुलींच्या समस्यांकरिता विशाखा समिती सभा सम्पन्न झाली या सभेला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मृदुला वानखडे,डॉ ग्रीष्मा मुळे तसेच दादासाहेब वरखेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापीका मंगला देशमुख या उपस्थित होत्या डॉ मृदुला वानखडे व डॉ ग्रीष्मा मुळे यांनी मुलींच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा समिती सदस्य कु शीतल टोळे यांनी केले त्यांनी विशाखा समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु निंघोट मॅडम यांनी केले कार्यक्रमाला सर्व विद्यार्थिनी व विद्यालयातील शिक्षिका यांची उपस्थिती होती