विनातिकीट प्रवाशी बसगागाडीत आढल्यास वाहकाची वेतनवाढ रोखणार
अनेक वाहकांचा याला विरोध*
कामगार संघटना आक्रमक पवित्रा उचलणार*
. प्रतिनिधी.आर्वी...
एसटी महामंडळाच्या बसेसमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्याचे अनेकदा तोंडी व.लेखी स्वरूपात आवाहन केले जाते, मात्र सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य घेऊन चालणाऱ्या एसटीच्या बससेमध्ये काही तुरळक प्रवाशी गर्दिचा फायदा घेऊन जाणीवपुर्वक तिकीट काढण्याचे टाळतात. मात्र असे असतांना सुध्दा एसटी च्या तपासणी भरारी पथकाला बसमध्ये प्रवासी विनातिकीट आढळल्यास वाहकाची,तीन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत,परंतु या निर्णयाला एसटीच्या वाहकांनी सक्त विरोध केला, असुन तसे लेखी पत्र एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत..
.तसी एसटी महामंडळाने वाहकांना अशा प्रकारची. कठोर शिक्षा करु नयेत. ही शिक्षा रद्द करण्याची मागणी एसटी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहेत.
.विशेष म्हणजे एसटीच्या तिकीट तपासणी व भरारी पथकाला, प्रवाशी विनातिकीट आढळल्यास २०१८पर्यंत ५०/रुपये दंड ते जास्तीत जास्त ३वर्ष वेतनवाढ रोखण्याची तरतूद या मोटार वाहन कायद्यात नमूद केली आहे. ही शिक्षा प्रकरणाच्या गांभिर्यानुसार चौकशी नंतर सक्षम अधिकारी निश्चित करीत होते, त्यामुळे वाहकांना ५०ते ५००रुपयापर्यत दंड व्हायचा. तसेच जाणीवपूर्वक तिकीट न देणाऱ्या वाहकांची १वर्ष ते ३वर्षापर्यंत वेतनवाढ थांबवली जात होती
……अर्थातच३१डिसेंबर२०१९ मध्ये एसटी महामंडळाने बसमध्ये विनातिकीट प्रवासी सापडल्यास वाहकाची सरसकट ५वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अनेक वाहकांनी तीव्र संताप व्यक्त करुन, आक्रमक पाऊल उचलण्याचा कामगार संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात दिला आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वाहकांचा संताप व.तीव्र भावना लक्षात घेऊन, एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा कालावधी कमी करून,३वर्ष केला, परंतु हा कालावधी सुध्दा अन्यायकारक असल्याने, सदर शिक्षेच्या तरतुदी मध्ये आणखी कालावधी कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहेत.
*प्रतिक्रिया*
वाहकांची वेतनवाढ रोखणार, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन आला आहेत. त्यामुळे या संदर्भात काही सांगणार नाहीत. परंतु आमच्या डेपोत सर्व वाहक बसमधील प्रवाशांच्या बसलेल्या जागेवर जाऊन तिकीट काढतात. या बाबतीत कोणत्याही प्रवाशांची तक्रार आली नाहीत. परंतु वाहक तिकीट देत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आल्यास,अशा वाहकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, या बाबतीत प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे एसटी महामंडळ कसोशीने प्रयत्न करील, अशी आम्ही ग्वाही देतो.
*आशीष मेश्राम*
डेपो मँनेजर आर्वी
*प्रतिक्रिया*
आधीच तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या वाहकावर,तीन वर्ष वेतनवाढ रोखण्याचा प्रयत्न न्यायाला धरून नाहीत. कारण महाराष्ट्रातील अनेक वाहक वर्ग एसटीमहामंडळामध्ये इमानेइतबारे दिवस-रात्र सेवा देत आहेत. आपल्या प्रकुतिचा विचार न करता, प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्परता दाखवत आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहकावर,हा निर्णय न लादता, ज्या वाहकांची एसटी मधली सेवा नकारात्मक आहेत व जे प्रवाशांना तिकीट देत नाहीत, अशावरच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. सरसकट वाहकावर अन्याय होता कामा नयेत. असे माझे मत आहेत.
*अविनाश ल टाके*
सामाजिक कार्यकर्ते आर्वी
*प्रतिक्रिया*
आधीच एसटी महामंडळाच्या बसमध्ये आमच्या विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा, लागतो, आम्ही प्रवाशांना विनातिकीट प्रवास करु देत नाहीत. त्यांच्या बसमध्ये बसलेल्या जागेवर जाऊन तिकीट काढतो.परंतु बसमध्ये प्रचंड गर्दी असताना, जवळच्या स्टापवरील काही प्रवासी तिकीट काढत नाही. त्यामुळे कमी किलोमीटर च्या प्रवासात लवकर उतरून जातात. त्यामुळे यालाही आम्ही जबाबदार नाहीत.
*एक वाहक*
आर्वी….