हटके

विलेन बनून आली तरुणी आणि त्यामुळे लग्नात झाला धिंगाणा

Spread the love

 हरियाणा / नवप्रहार मीडिया 

          लग्न म्हटलं की दोन्ही कडील।मंडळींचा आनंद वेगळाच असतो. पण या आनंदासोबत मनात एक भीती असते की लग्न कुठल्याही बाधे शिवाय पूर्ण झाले पाहिजे.कारण लग्नात कधी काय अडचण येईल याचा काही नेम नसतो.  एका लग्नात असाच प्रकार घडला . सप्तपदी घेण्याआधीच मंडपात एका तरुणीची एन्ट्री होते. ती स्वतःला मुलाची गर्लफ्रेंड असल्याचे सांगते आणि आनंदाचे वातावरण अचानक भांडणात बदलते. वधु लग्नास नकार देत वरात परत पाठवते.

हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील मॅरेज पॅलेसमध्ये चरखी दादरी येथील सैनीपुरा परिसरातून ही वरात आली होती. यामुळे नवरदेवाला वधूशिवायच लग्नाची परत आणावी लागली आहे.

नारनौलच्या सिंघाना रोडवर असलेल्या एका मॅरेज पॅलेसमध्ये 6 मार्चच्या रात्री लग्न होतं. लग्नसोहळ्यात सर्व काही व्यवस्थित चाललं होत. आनंदाचं वातावरण होतं. चरखी दादरी येथून लग्नाची वरात आली होती. त्यानंतर नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती नवरदेवाची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकल्यावर नातेवाईक आणि वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाला. वाद पुढे वाढत गेला आणि वधूने नवरदेवासोबत लग्न करून सासरी जाण्यास नकार दिला. लग्न मोडल्याने लग्नातील पाहुणेही हैराण झाले होते.

लग्नाबाबतही विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. नवरदेवाच्या गर्लफ्रेंडने दादरीहून पोलिसांना आणून गोंधळ घातल्याचीही चर्चा आहे. दुसरी चर्चा अशी देखील आहे की हुंड्याबाबतही काही वाद झाले आहेत. अद्याप लग्न समारंभात झालेल्या या वादाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close