Uncategorized
श्री.सुखदेवराव अभ्यंकर विद्यालयामार्फत ‘गाव फेरी’मतदान जनजागृती रॅली

अंजनगाव सुर्जी (वार्ता)
लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वापरून मतदान करावे व मतदारांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणुन
अंजनगाव तालुक्यांतील हंतोडा येथील श्री.सुखदेवराव अभ्यंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘गाव फेरी’ या उपक्रमअंतर्गत. हंतोडा मतदान जनजागृती रॅली आयोजन करण्यात आली होती.या रॅली मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो हा नारा लावत हंतोडा गावातील गल्ली- बोळात मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. ह्या रॅली मध्ये शाळेचे मुख्याध्याक केतन खिरकर, विपिन हंतोडकर, सारिका वाठ , अनंता मोहोड,मयुरी लोखंडे, श्रद्धा गोळे, भास्कर चव्हाण, धम्मपाल आठवले, अश्वघोष अभ्यंकर कर्मचारी विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1