सामाजिक

विजेच्या कडकडात मुसळधार पावसात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे आमरन उपोषण सुरूच…

Spread the love

भंडारा / हंसराज.

दिनांक 1जुलै 2024 पासून शामराव धोंडू गायधने राहणार खमाटा हा शेतकरी न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर बेमुदत आमरन उपोषणावर बसला आहे. त्यात अचानक दिनांक 4/7/ 2024 ला रात्री विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस भंडारा शहरात पडला. त्या विजेच्या कडकडात आलेल्या मुसळधार पावसात न्याय मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकरी शामराव धोंडू गायधने वय79 वर्ष उपोषणावरच बसला असून भंडारा येथील प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत विचारपूस केली नाही व त्यांच्या उपोषण मंडपाला येऊन भेट दिली नाही. हे दुर्दैव असून लोकशाहीला काळीमा फासणारी प्रकार भंडारा येथे घडलेले आहे. या घटनेचा सामाजिक कार्यकर्ता व अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, नितेश बोरकर, चंद्रशेखर खोब्रागडे, पुरुषोत्तम गायधने , यांनी
भंडारा येथील शासकीय अधिकाऱ्यांच्यायांचा निषेध केला आहे केला असून शासनाने अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी पत्रकाद्वारे मागणी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close