विद्यापीठ पदवी ऑनलाईन डीजी लॉकर वर उपलब्ध
सिनेट सदस्य डॉ नितीन टाले यांच्या प्रयत्नांना यश
अमरावती / प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र आता शासनाच्या डिजिलॉकर या ॲपवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेले आहे.
विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रमाणपत्रे व कामकाज ऑनलाइन पद्धतीने व्हावे असा प्रस्ताव सिनेट सदस्य डॉ नितीन यांनी मांडला होता. हा प्रस्ताव मान्य करून संबंधित प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्याची कार्यवाही विद्यापीठाने सुरू केली. सत्र २०१७-१८ पासूनचे पदवी प्रमाणपत्र डिजी लॉकर या शासनाच्या ॲपवर उपलब्ध झालेले आहे. त्यापूर्वीचे पदवी प्रमाणपत्रे तसेच सर्व गुणपत्रिका ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांना लवकरच ही सुविधा प्राप्त होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व सुविधा ऑनलाइन पद्धतीने लवकरच उपलब्ध होणार आहे.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळवण्याकरिता होणारा त्रास कमी होणार असून आपल्या भ्रमणध्वनीवरच हे प्रमाणपत्रे त्यांना प्राप्त होतील.
विद्यापीठाच्या या निर्णयाचे अनेक विद्यार्थी व पदवीधर संघटनांनी स्वागत केलेले आहे.