हटके

जळणाऱ्या चीतेतून मृतदेह उठत असल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल 

Spread the love

                        सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओ वर विश्वास ठेवावा अथवा नाही असा प्रश्न स्वतःलाच पडतो. कारण एकतर व्हिडीओत जो दावा केला जातो तो स्पष्ट दिसत नाही. दुसरे व्हिडिओ टाकणारा जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवत प्रतिक्रिया देणे योग्य नसते.

अनेकदा असे आश्चर्यकारक व्हिडीओ समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ विस्मयकारक आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जळणाऱ्या चितेतून उठली आहे. हा व्हिडीओ इतका भयानक आहे की, पाहून कोणाचाही थरकाप उडेल. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, व्यक्ती मेल्यावर त्याच्या चितेची राख होते. पण हे व्यक्ती चितेतून कसा उठला.

व्हिडीओत काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, स्मशानभूमीत एक चिता जळत आहे. पण आश्चर्यांची बाब म्हणजे चितेवर मृतदेह उठून बसल्याचं दिसत आहे. तो मृतदेह काहीतरी विचार करत आहे. एक व्यक्ती जेव्हा चितेची व्हिडीओ रेकॉर्ड करत असतो. त्यावेळी त्याला एक मृतदेह समोर दिसतो. हे पाहून तो खूप घाबरतो. त्याला त्या मृकदेहाचे डोके खाली आहे आणि तो काहीतरी विचार करत असल्याचे दिसते

व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती सांगत आहे की शेजारी किती मृतदेह जळत आहेत. नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आलेला एक मृतदेह देखील आहे, तरीही मृतदेह पूर्णपणे जळाला नसला तरी तो मृतदेह अचानक उठून बसला आहे. हा व्हिडीओ एक्सवर @sourabhdubey008 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया या व्हिडिओला भरपूर लाईक्स मिळाल्या आहेत.

 

 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मोठ्या संख्येने लोक शेअर आणि कमेंट करत आहेत. काही युजर्सनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. हे दृश्य पाहून काही युजर्स घाबरले आहेत. तसेच एका यूजरने लिहिले आहे की, ‘फोनचे चार्जिंग तपासण्यासाठी मृत शरीर जागे झाले.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘भाऊ त्याची क्रोम हिस्ट्री डिलीट करायला विसरला,’ आणखी एकाने मजेशीर कमेंट केली आहे. ‘मृतदेहाला गरम होऊ लागल्याने तो जळत्या चितेतून उठला आहे. तर अनेकजण या एडिटेड व्हिडीओ म्हणत आहे. एका युजरने म्हणले आहे की, या व्हिडीओला AI च्या मदतीने एडिट करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close