लोकसभेच्या निवडुकीच्या अनुषंगाने चांदुर रेल्वेच्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केली भूमिका
चांदुर रेल्वे /प्रतिनिधी
विदर्भ राज्य आंदोलन समि!ती चांदुर रेल्वेला गाडगेबाबा मार्केटमध्ये दिनांक 12 मार्च 2024 बैठक घेण्यात आली.या बैठकीत अकोला येथे झालेल्या संयुक्त बैठकी संबंधी चर्चा करण्यात आली. तसेच जय विदर्भ पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व अन्य सहयोगी पक्षांना विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पाठिंबा असून त्याप्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने आपापल्या क्षेत्रात कामाला लागावे व विदर्भावर अन्याय करणाऱ्या व वेगळ्या विदर्भाचा विरोध करणाऱ्या पक्षांना हिसका दाखवावा असे बैठकीतून कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले .त्याकरिता पत्रकामध्ये समितीच्या वतीने तफावतीची आकडेवारी दिलेली आहे ते भिंतीपत्रके अथवा पोस्टर्स प्रत्येक मोहल्यात व गावागावात प्रत्येकाच्या दरवाज्यावर निवडणुकीपूर्वी लावण्यात यावे़.
विदर्भावर आज पर्यंत होत असलेल्या भेदभावासंबंधी नागरीकांना माहिती देण्यात यावी. तसेच जाहीरपणे पुढाऱ्यांना प्रश्न विचारण्यात यावे. विदर्भात कारखाने 2616 पुणे नाशिक (10 जिल्हे) कारखाने 15387. सिंचन प्रकल्प 101 पुणे नाशिक विभाग 202 .विदर्भात कृषी पंप 8 लाख 98 हजार 715 पुणे नाशिक विभागात कृषी पंप 23लाख 53 हजार 192 इतकी तफावत कशी ? पुरेशी वीज निर्माण करणाऱ्या विदर्भात लोडशेडीन्ग अंधकार, उर्वरीत महाराष्ट्रात मात्र झगमगाट यासंबंधी प्रश्न विचारावे. या बैठकीला राजेंद्र आगरकर, अशोक हांडे, रियाज खान ,बाबाराव जाधव, एड मनोहर देशमुख ,दीपक शंभरकर, रमेश मेंढे, प्रवीण बनसोड ,डॉ सुरेंद्र खेरडे, अशोकभाऊ मेश्राम, बाबाराव शेळके, समीर ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते