विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेचा 31 डिसे अंजनगाव (सुर्जीत) चक्का जाम
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
1मे 1960 ला विदर्भातील जनतेची संमती न घेता विदर्भाला महाराष्ट्रात ढकलण्यात आले तेव्हा जो करार करण्यात आला तो महाराष्ट्र सरकार ने पाडला नाही त्यामुळे विदर्भाची अधोगती होऊन गेल्या 12 वर्षात 35 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या व बेरोजगारी वाढली या अन्यायाला वाचाफोडण्यासाठी व विदर्भातील जनतेला सुखाने व सन्मानाने जगता यावे या करिता दिनांक 27 डिसेंबर 2023 संविधान चौक नागपूर येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला वि.रा.आ.स चे अध्यक्ष वामनरावजी चटप , देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे ,पूर्वअध्यक्ष अरुण भाऊ केदार बसले आहे ,तसेच एड. सुरेश वानखडे यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे आमरण उपोषणला सुरुवात झाली आहे. आणि म्हणून आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ बस स्टॅन्ड चौक अंजनगाव सुर्जी येथे ठीक 1 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला जास्तीत जास्त विदर्भ प्रेमीनि उपस्तिथ राहण्याचे आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने माधवराव गावंडे जिल्हा अध्येक्ष शेतकरी संघटना, गजानन पा. दुधाट तालुका अध्येक्ष स्व. भा. प., संजय हाडोळे ता. अध्येक्ष शेतकरी संघटना, सुनील पाटील साबळे जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती, देविदास पा. ढोक, अशोक पा. गिते, मनोहर दादा रेचे, संजय हिंगे, किशोर पाटील काळमेघ, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, अरुण गोंडचोर यांनी केले आहे.