क्राइम

वरुड पोलिसांनी केला २४ तासात चे आत हत्याचा गुन्हा उघड

Spread the love

 

प्रेम प्रकरणातून केली होती पतीची हत्या

प्रतिनिधी मुबीन शेख. शिरजगाव कसबा

अमरावती जिल्ह्यात येणारे वरुड मध्ये दि. १४/०५/२०२३ रोजी एकलविहीर येथे राजेंद्र ढोके यांचे विहीरीत अनोळखी इसमाचे शरीराचे हाडे पोत्यात भरून टाकलेली मिळुन आल्याने पोलीस स्टेशन वरुड येथे अज्ञात इसमा विरुद्ध अप.क्र. २९७/२०२३ कलम ३०२.२०१ भा. दं. वि. चा गुन्हा दाखल केला असता सदर प्रकरणी मा. अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण. यांनी भेट देवुन तपासाबाबत सुचना दिल्याने त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे ठाणेदार पोलीस स्टेशन वरुड व त्यांचे पथकांनी तपास केला असता एकलविहीर येथील शेषराव वासुदेव इरपाची हा काही महीण्यापुर्वी हरविले बाबतची माहीती प्राप्त झाल्याने ठाणेदार यांनी तपास सुत्रे हलविली व हरविले इसम शेषराव वासुदेव इरपाची याची पत्नीचा शोध घेतला त्याची पत्नी रंजना शेषराव इरपाची ही वरुड येथील शहापुर येथे दुसन्या पुरुषासोबत राहत असतांना मिळुन आल्याने तिला विहीरीत सापडलेले अनोळखी इसमाचे हाडे व कपडे दाखविले असता कपडे पाहुन ते तिचेच पति शेषराव इरपाची याचे असल्याचे ओळखले वरुन पोलीसांनी रंजना शेषराव इरपाची व ज्ञानेश्वर किसनराव कुमरे यांची कसून चौकशी केली असता शेषराव इरपाची हा रंजना हीचे चारीत्रावर संशय घेवून रंजना हीला शारीरीक व माणसीक त्रास देत असे व मारहाण करीत असे त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळुन रंजना हीने ज्ञानेश्वर कुमरे याचे सोबत कट रचून रात्रीचा अंधाराचा फायदा घेवुन रंजना शेषराव इरपाची होने कुऱ्हाडीने शेषराव इरपाची याचे माणीवर सपासप वार करुन त्याचे मुंडके तोडले व ज्ञानेश्वर कुमरे याचे मदतीने शेषराव इरपाची याचे प्रेत राजेंद्र ढोके याचे शेतातील विहीरीत पोत्यात मोठ मोठे दगड बांधुन फेकुन दिले अशी कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्हयात आरोपी रंजना शेषराव इरपाची वय ३८ वर्ष रा. शहापुर,व ज्ञानेश्वर कुमरे वय वर्ष रा. शहापुर अटक करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण. शशीकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण. डॉ. निलेश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप चौगावकर ठाणेदार पोलीस स्टेशन वरुड. सहाय्यक पोलीस निरीक्षक .दिपक महाडिक, पोलीस उपनिरीक्षक धिरज राजुरकर, पोलीस उपनिरीक्षक दिपक दळवी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश शेगोकार, पोलीस अंमलदार राजु मडावी, राजु चव्हाण, दिलीप राउत, रत्नदिप वानखडे, महिला पोलीस पुनम वंजारी, किरण गावंडे, किरण दहिवाडे, समीर धांडे, विनोद पवार, सचिन भगत, प्रफुल लेव्हरकर, गोवर गिरी, रामेश्वर इंगोले, जॉन रुबन, चालक अशोक भुसारी, कैलास हटवार यांचे पथकाने केली आहे. गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षण .दिपक महाडिक हे करीत आहे.

O

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close