माळी समाज बांधवा तर्फे सावित्रीआई फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी..
चांदुर रेल्वे / प्रतिनिधी
अमरावती जिल्यातील चांदुर रेल्वे शहरामधे मारोती देवस्थान येथे सावित्रीआई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे सुरुवातीला संगीतमय भजन गायनाने करून स्वागत गीत गायला गेले व क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेला तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वासुदेव वातकर यांचे बच्चू वानरे माजी नगरसेवक चांदुर रेल्वे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो देण्यात आला तसेच कार्यक्रमाचे वक्ते वैभव निमकर यांचा सत्कार माजी नगरसेवक अजय हजारे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील मालखेडे यांचा सत्कार सत्कार हर्षल वाघ यांच्या हस्ते करण्यात आला तसेच समितीचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांचा सत्कार ओम प्रकाश मानकर यांच्या हस्ते करण्यात आला व समितीचे सचिव एडवोकेट विशाल भोयर यांचा सत्कार अभय बानाईत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात श्रीशा हर्षल वाघ या चिमुकलीने सावित्रीबाई यांच्या वेशभुशेत आली असता या कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा वातकर सर यांचे मनोगत व्यक्त झाले व कार्यक्रमाचे वक्ता वैभव निमकर यांच्या भाषणाला सुरुवात केली सुरुवात झाली त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर प्रगाढ माहिती उपस्थित सर्वांना त्यांना दिली तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवन कार्याला सुद्धा उजाळा दिला उपस्थित त्यांनी टाळ्यांचा गडगडात करून कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले चांदुर रेल्वे शहरामध्ये बरेच वर्षानंतर सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे शहरवासीयांमध्ये उत्साह निर्माण झाला व कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे संचलन अंकिता नागतोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीचे सचिव एडवोकेट विशाल भोयर यांनी केले या कार्यक्रमाला हजारो समाज बांधव, तसेच महिला शहरवाशी उपस्थित होते व या कार्यक्रमाचे यशस्वीते करता सावित्रीबाई फुले उत्सव समितीचे कोषाध्यक्ष अमोलभाऊ वानखडे , प्रज्वल भोयर , अथर्व श्रीखंडे माजी नगरसेवक बच्चुभाऊ वानरे माजी नगरसेवक अजय भाऊ हजारे माजी नगरसेवक प्रफुल्लभाऊ कोकाटे , हर्षलभाऊ वाघ ओमप्रकाश मानकर ,पंकज चर्जन , पंकज गोरे, आशिष झिमटे , डॉ वाढोनकर , डॉ कोठेकर अभय बानाईत, रोशन आगलावे , अजय बानाईत, जगदीशभाऊ होले परिश्रम घेतले