शैक्षणिक

आदर्श महाविद्यालय येथे मुलींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Spread the love

 

दामिनी क्लब तर्फे नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन

धामणगांव रेल्वे:/ प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने धामणगाव शिक्षण संस्था द्वारा संचलित आदर्श महाविद्यालय येथील दामिनी क्लब (Women’s Cell) च्या वतीने कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी विविध गायन व नृत्य छटा प्रदर्शित केल्या. विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कला गुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दामिनी क्लबच्या सर्व सदस्यांनी केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेंद्र गांडोळे यांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मागदर्शन केले. गायन स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विजय थूल व प्रा. स्नेहा देशमुख रसायनशास्त्र विभाग या लाभल्या असून नृत्य स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून महाविद्यालयातील प्रा.डॉ. दीपक श्रृंगारे अर्थशास्त्र विभागप्रमुख व प्रा. प्रिती चिरडे जीवशास्त्र विभाग या लाभल्या होत्या. गीत गायन स्पर्धेमध्ये एकूण २७ विद्यार्थ्यांनी तर नृत्य स्पर्धेमध्ये एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नृत्य स्पर्धेमध्ये कु. नेहा सावलकर अकरावी विज्ञान हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक कु. साक्षी अटाळकर बी.एससी. भाग – ३ व तृतीय क्रमांक कु. श्रुती कापडे ११ वी इंग्लिश कॉमर्स या विद्यार्थिनीने प्राप्त केला. गायन स्पर्धेमध्ये पायल गाडेकर ११ वी इंग्लिश कॉमर्स प्रथम क्रमांक, अपूर्वा आंबटकर १२ वी सायन्स द्वितीय क्रमांक व तानिया टेकाम बी.एससी. भाग- २ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून कार्यक्रमाची तांत्रिक बाजू प्रा. मोहसीन कुरेशी यांनी यशस्वीपणे सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. माया मावळें यांनी केले. तर आभार प्रदर्शन दामिनी क्लबच्या समन्वयिका प्रा. डॉ. अश्विना रंगारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दामिनी क्लबच्या सदस्या प्रा. डॉ. शिल्पा विधळे, प्रा. डॉ. श्वेता शर्मा व प्रा. डॉ. पूनम गहुकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा राऊत बी.एससी.भाग-२ हिने केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे सुध्दा सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाला एकूण २४० विद्यार्थ्यांचा व २० शिक्षकांचा सहभाग लाभला.कार्यक्रमाला सर्व महाविद्यालयीन प्राध्यापिका, व शिक्षक वर्ग प्रामुख्याने उपस्थित असून सर्व विद्यार्थिनी बहुसंख्येने सभागृहात उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
2
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close