सामाजिक
सावित्रीबाई सोशल असोशिएशनच्या वतीने सावित्रीबाई फ़ुले जयंती निमित्त विविध कार्यकमाचे आयोजन
वर्धा / प्रतिनिधी
श्रीराम मंदीर गांधीनगर, येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रोजी सावित्रीबाई सोशल असोशिएशनच्या वतीने विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यकमाचे आयोजन अध्यक्षा अरुणाताई घोटे यांनी आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून डॉ. सौ. मंगला वि. चौधरी, प्रमुख पाहुण्या वनिताताई देशमुख, शांताताई पावडे, कांताबाबई कालोकर, आशाताई चन्ने, कुस मताई फुकट, उषा नाखले, रोशना जागलेकर प्रामुख्याने उपस्थ्ति होत्या. पाहुण्यांच्या हस्ते सर्व प्रथम सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले, इंदिरा गांधी, माँसाहेब जिजाऊ यांच्या फोटोला माल्यार्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. व्सवगत समारंभानंतर चिमुकल्यांनी विविध वेष भुषा करुन एकपात्री नाटक सादर केले. सावित्रीबाईच्या जिवनावर आधारित महिला भजनी मंडळींनी आपापले भजने सादर केले.
तसेच मान्यवरांनी आपापले विचार सादर केले. सदर कार्यकमाच्या यशस्वीकरीता मनिषा फिसके, शिल्पा जगवार, लता नंदत्धने, किरण वंजारी, सिंधुताई मसराम, विभा राऊत, विना कडू, भारती वानखेडे, सुधाताई गाडेगोणे, सारीका उरकुडे, कल्पना पटेल व इतरांनी यशसवीकरीता प्रयत्न केले. सर्व कार्यक्रमाचे संचालन संजिवनी पवार हिने केले. याप्रसंगी शहरातील विविध बचत गटाच्या महिला व सामाजिक क्षेत्रात काम करणा-यामहिलाभगिनी प्रमुख्याने हजर होत्या. सहभागी भजनी मंडळींना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व मानधन देण्यात आले तसेच स्वरुची भोजनाने कार्यकमाची सांगता झाली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1