वंचित बहुजनचा घाटंजीत जनक्रोश मोर्चा
मोर्चातील स्वरूप पाहता पोलीसांचा ठेवला तगडा बंदोबस्त
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी येथील वंचित बहुजनचा आघाडी नेतृत्वात व गोंडवाना संग्राम परिषदेच्या वतीने घाटंजी तहसिलवर मोर्चा धडकला. मोर्चे दिनी सकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी मोर्चावेळ दूपारी बारा चे जवळपास असल्याने सहभागी होणा-या कार्यकर्ते शेतकरी व आदिवासी बांधवांची मोर्चाप्रती उत्साह कायम होता. यात दुपारी बारा वाजता नंतर मात्र पावसाने उसंत घेतली व नियोजीत मोर्चातील कार्यकर्ते गोळा झाले नंतर शिवाजी चौक ते गिलाणी काॅलेज चौक ते बसस्थानकावरून पारवा पाॅईंट ते तहसील कार्यालय या मार्गाने पावसाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेणी जन आक्रोश मोर्चात हजेरी लावली होती.
केंद्र,राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकरी वर्ग पुरता अडचणीत आला आहे. विविध प्रवर्गातील नागरिकांमध्ये घडत असलेल्या अमानवी वागणूकीमूळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मणिपूर राज्यात होणाऱ्या महीला अत्याचारामुळे आदिवासी समाजात असंतोष पसरला आहे. बेरोजगारी,महागाई, शासकिय नोकरीचा अभावाचे प्रमाण वाढलेली आहे. अशा प्रश्नांना घेऊन आज घाटंजी तहसील कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला आहोता.शेतक-यांचा जिवाभावाचा पोळा सण जवळ आला असून अतिवृष्टी पुर ग्रस्तांना अजूनही शासकीय मदत मिळाली नाही.पोळ्यापूर्वी ही मदत देण्यात यावी,शेतकरी,पुरग्रस्त, शेतमजुरांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावे त्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणीही या जनक्रोश मोर्चाच्यातून करण्यात आली. मागण्याचे निवेदन घाटंजी नायब तहसीलदार होटे यांना देण्यात आले.यावेळी गोंडवाना संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन मसराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तेव्हा सरकार व प्रशासनाच्या निगरघट्ट पोकळ आश्वासणी कारभारावर टीका केली.ह्या मोर्चाचे नैतृत्व वंचित बहुजन आघाडीचे घाटंजी तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांणी केले तर,उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी संघपाल यांनी शासन व प्रशासनाने चालवलेल्या तुघलकी कारभारावर प्रश्न उपस्थित करत शासन सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना,अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त वंचितांना मदत कधी देणार हा प्रश्न उपस्थित केला. तसेच मदत त्वरित द्यावी अशी मागणी केली.उपस्थितांना मार्गदर्शन करतांना यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे,यांनी ओबीसी ची जात निहाय जनगणना संदर्भात वक्तव्य केले. गोंडवाना संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोतीराव कनाके यांनी ही आदिवासी ची खावटी तत्काळ चालू करा अशी मागणी केली.या मोर्चात नितीन राठोड, विरेंद्र पिलावन,तुकाराम कोरवते, अरविंद चौधरी, पांडूरंग निकोडे,सह ईतर पदाधिकारी, कार्यकर्ते,शेतकरी व वंचित बहुजनचे कार्यकर्ते बांधवांची उपस्थिती होती.
मोर्चाच्यातील स्वरुप पाहता घाटंजी ठाण्याचे ठाणेदार निलेश सुरडकर यांणी मोर्चाचे स्वरक्षणार्थ चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.