वंचीत-बहुजन आघाडी ने दिला धरणे आंदोलनाल पाठिंबा!
वाचनालयाची अतिक्रमणित इमारत खाली करण्यासाठी नागरिकांचे धरणे आंदोलन जारी!
वाडी(प्र.) वाडी परिसरातील प्रियदर्शी गृहनिर्माण सहकारी संस्था द्वारे स्थापित धम्मकिर्ती नगर ,महाप्रज्ञा बुद्ध विहार मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी राखीव असलेल्या वाचनालयाची मोठी इमारत 2014 ला काही अटी शर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटलला तात्पुरत्या स्वरूपात उपचार केंद्र चालू करण्यासाठी दिली होती.
मात्र मुदत संपल्यानंतरही संस्थेने ती रिक्त न केल्याने व संस्था संचालक टोलवाटोलवी चे असभ्य उत्तरे देत असल्याने संतप्त होऊन स्थानिक नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन रुग्णालय इमारती समोर प्रारंभ केले असून आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.या आंदोलनाची दखल घेत वंचीत बहुजन आघाडी ने आंदोलन स्थळी धाव घेत समस्या समजून घेऊन आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे.
या संदर्भात वंचीत बहुजन आघाडी ने सांगितले की, वाचनालयाची ही इमारत हॉस्पिटल चा करार संपल्याने रिक्त करण्या ऐवजी लता मंगेशकर व्यवस्थापनाने ही जागा दुसऱ्या त्यांच्याच संस्थेद्वारे संचालित हर्ड फाउंडेशन ला किरायाने दिली व रुग्णालयात फिजियो उपचार केंद्र सुरू केले.हा पोट भाडेकरी ठेवण्याचा नियमबाह्य प्रकार आहे.दुसराही करार
2019 ला मुदत संपल्यानंतर देखील ही या दोन्ही संस्थेने ही जागा रिक्त करणे ऐवजी अनधिकृतपणे 2024 पर्यन्त अजूनही हॉस्पिटल सुरू ठेवलेले आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक,अन्यायकारक ,व आक्रोशीत करणारी असून नागरिकांनी व संस्थेने वारंवार या संस्थेचे संचालक डॉ.अमोल देशमुख यांना विनंती करूनही इमारत रिक्त करण्यास ते नकार देत असून असभ्य भाषेत प्रतिउत्तर देत आहेत.त्या मुळे येथील स्थानिक नागरिकांनी जे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असून अतिक्रमण केलेल्या दोन्ही संस्थेने ही इमारत तातडीने रिक्त करून नागरिकांना हस्तांतरित करावी अशी मागणी करण्यात येत असून या संदर्भात पोलीस प्रशासन व हर्ड फाउंडेशन,लता मंगेशकर प्रशासन यांनी तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. धरणे आंदोलन मंडपात
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष सुमित गोंडाने,
अतुल शेंडे,सह वंचित चे अनिल पुंड,ईश्वर उके, प्रवीण तायडे इत्यादींनी निवेदन देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा घोषित केला व समर्थनाचे पत्र सुपूर्द केले.