क्राइम

तीन दिवसांनी लग्न असलेल्या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून फेकला ; मृत्यू 

Spread the love

तरुण कोट्याधीश असल्याची चर्चा

दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

         युपी च्या कानपुर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे युवकाचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे हा तरुण कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. आणि 3 दिवसानंतर त्याचे लग्न होणार होते. या घटनेने खळबळ माजली असून पोलिसां समोर या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

 पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे, त्याचबरोबर घटनास्थळी पोलिसांना दारुचा पाऊच मिळाला आहे. त्याचबरोबर तिथं दोन ग्लास सुध्दा सापडले आहेत . बुधवारी गावातील काही लोकं नोन नदीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना तिथल्या शेतात एक मृतदेह दिसला. त्यावेळी त्यांनी ही बातमी गावातील लोकांना सांगितली. गावातल्या लोकांनी ही बातमी पोलिसांना सांगितली. त्या जिल्ह्याचे एसपी दिनेश शुक्ला यांनी सुध्दा घटनास्थळी भेट दिली.

मृत्यू झालेल्या तरुणाने पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातला होता. त्याचं वय २७ असल्याचं सांगितलं जात आहे. त्या तरुणाची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस तपासाची दिशा ठरवतील.

मोहनपूर गावातील लोकांनी पोलिसांना त्या तरुणाचं नाव धर्मेंद्र कुरील असं सांगितलं आहे. त्याचा बुधवारी हळदीचा कार्यक्रम सु्द्धा झाला आहे. घरातील हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर तो घरातून बाहेर निघाला होता. आज त्याचं लग्न होणार होतं. लग्नाच्या तीन दिवस आगोदर त्याची हत्या झाली आहे. पोलिस तो तरुण कोणाच्या बरोबर बाहेर गेला होता याची चौकशी करीत आहेत.

पोलिसांनी सुध्दा हे प्रकरण पाहिल्यानंतर धक्का बसला आहे. पोलिस कुटुंबियांची आणि नातेवाईकांची चौकशी करीत आहेत. ज्यावेळी हा तरुण रात्री गायब झाला होता. त्यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना का सांगितलं नाही. प्रायव्हेट पार्ट का कापला आहे. पोलिसांना नातेवाईकांवरती संशय आहे. कारण त्या तरुणाकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. हत्येच्या पाठीमागचा मुख्यसुत्रधार कोण आहे याचा पोलिस शोध घेत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close