अपघात

दैव बलवत्तर म्हणून वाचली ; थरकाप उडवणारा व्हिडीओ 

Spread the love

                 कुठलीही घटना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत आहे. अनेक घटना अश्या असतात ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचतात. यातील काही व्हिडीओ हे असे असतात की ते पाहिल्यावर मनाचा थरकाप उडतो. असाच अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दैव बलवत्तर म्हणून या व्हिडिओत दिसणारी महिला बचावली .

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

भारतात दररोज अनेक रस्ते अपघात होतात, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. बरेच लोक भाग्यवान असतात जे मृत्यूच्या दारात जाऊन परत येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला तिच्या नवऱ्याच्या मागे बाईकवर बसलेली आहे.हे जोडपे एका रस्त्यावरून जात असताना समोरून एक जेसीबी येतो. जेसीबीचा मागचा कोपरा दुचाकीला लागतो आणि दाम्पत्य दुचाकीवरून खाली पडले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका जोडप्याच्या मोटारसायकलला जेसीबीला धक्का लागतो आणि दोघेही कसे पडतात हे दिसत आहे. या घटनेत ही महिला जेसीबीच्या चाकाच्या अगदी जवळ जाऊन पडली आणि अवघ्या काही इंचांनी धडकून बचावली. महिला उडी मारून जेसीबीच्या दिशेने पडली. व्हिडिओ पाहून तुम्ही हादरून जाल. ही घटना मेरठच्या गणेशपुरीमध्ये खट्टा रोड येथे घडली होती, परंतु आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ विनीत जी नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे, तर यूजर्सही त्यावर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले… महिलेच्या नशिबात मृत्यू लिहिलेला नाही. दुसऱ्या युजरने लिहिले… आज यमराज सुट्टीवर होते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… ही पूर्णपणे बाईक रायडरची चूक आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close