हटके

या कारणाने जळगाव शहरात मजली खळबळ

Spread the love

वर्गमित्र असलेले अल्पवयीन विद्यार्थिनी आणि विद्यार्थी बेपत्ता

जळगाव  / नवप्रहार मीडिया

                शहरातून एकाच वर्गात शिकणारे अल्पवयीन  मुलगा आणि मुलगी पळून गेल्याने शहरात खळबळ माजली आहे. हे दोन्ही सिंदी कॉलनी येथील रहिवासी आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनी परिसरातील मुलगा व मुलगी एकाच वर्गात शिकतात. गुरूवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी पसिरात शाळेत असताना हे दोन्ही जण बेपत्ता झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु दोघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

अखेर दोन्ही अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close