राजकिय

वाचा शिंदेंनी कुठल्या राज्यात दिला ठाकरेंना झटका

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

               शिंदे गटाने बंडीयाळी केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता.आणि यामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर यावे लागले होते. त्यांनतर शिंदे आणि ठाकरे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असून 16 आमदारांच्या भावीतव्याबद्दल सुप्रीन कोर्टात सुनावणी झाली असून कुठल्याही क्षणी त्याचा निकाल येऊ शकतो. पण या नंतर सुद्धा शिंदे आणि ठाकरे गटात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन तनातनी सुरू आहे. राज्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून शिंदे यांनी ठाकरे यांना धक्के दिले आहेत. पण आता तर शिंदे यांनी राज्याबाहेर सुद्धा ठाकरे गटाला सुरुंग लावले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आधी ठाण्याचा गड ठाकरे गटाच्या हातून काबीज केला. ठाणे महापालिकेचे काही नगरसेवक वगळता इतर सर्वच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. 40 आमदार आणि अनेक खासदार शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर शिंदे यांनी नाशिकमधील सर्व कार्यकर्त्ये आपल्याकडे वळवले. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांचं हे धक्कातंत्र सुरुच आहे.

एकनाथ शिंदे यांनी आता तर थेट राष्ट्रीय पातळीवर ठाकरे गटाला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. त्याची सुरवात एकनाथ शिंदे यांनी थेट त्रिपुऱ्यातून केली आहे. त्रिपुऱ्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण ठाकरे गटाला हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा धक्का मानला जातोय.

 

 

राष्ट्रीय कार्यकारिणी देशात पक्षाचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. पण एका राज्याच्या प्रदेशाध्यक्षानेच राजीनामा देवून शिंदेंच्या पक्षात प्रवेश केलाय. या महत्त्वाच्या घडामोडनंतर राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळतो की ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळतो हे समोर येईलच. पण हा निकाल येण्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद याचे शिवसेना पक्षात नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close