विदेश

वाचा कुठल्या बस अपघातात आगीत होरपळुन 30 प्रवाश्यांचा झाला मृत्यू 

Spread the love

कराची / नवप्रहार वृत्तसेवा

                कराची वरून इस्लामाबाद कडे जाणाऱ्या बस ची पिकअप व्हॅन सोबत समोरासमोर धडक झाल्याने बस ने पेट घेतला. आणि त्या आगीत होरपळुन 30 प्रवाश्यांचा मृत्यू झाला. बस मध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसला आग लागली ती बस कराचीहून इस्लामाबादला जात होती. प्रवासात बसने पिकअप व्हॅनला धडक दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल भरण्यात आले होते. त्यामुळे या धडकेनंतर बसला आग लागली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात ३० नागरीकांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बसची राखरांगोळी झाली.

याआधी खैबर पख्तुनख्वाच्या उत्तर वझिरीस्तानच्या शॉवाल तहसीलमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. येथे एका व्हॅनमध्ये स्फोट झाला, त्यात 11 मजुरांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात दोन मजूरही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शव्वाल तहसीलमधील गुल मीरकोटजवळ हा स्फोट झाला. येथून लष्करी ताफा जात होता, त्यानंतर आयईडीचा स्फोट झाला, ज्यामध्ये निष्पाप मजूरही बळी पडले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close