हटके

वाचा चोरांनी तरुणी च्या हातातून हिसकावलेली पर्स क तिला  का केली परत 

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                        काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती. दरोडेखोरांनी स्कुटी वरून जाणाऱ्या नवरा बायकोला अडवून प्रथम तिच्या अंगावरील दागिने काढायला लावले होते. पण ते दागिने नकली आहे हे समजल्यावर त्यांनी ते दागिने तिला परत केले. नवऱ्याचे पॉकीट पाहिल्यावर त्यात फक्त 20 रु. सापडल्याने त्यांना त्या कपल ची ईतकी कीव आली की त्यांनी त्यांच्या मुलाच्या हातात 100 रु दिले. याच्याशी मिळत्या जुळत्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुणीचा हातातून हिसकावलेला पर्स त्यांनी तिला परत केला. चला तर मग जाणून घेऊ काय आहे प्रकरण 

 तर यामागचं कारण आहे तरुणीचा बॉयफ्रेंड.  खरंतर जेव्हा चोरीची घटना घडली तेव्हा या तरुणीचा बॉयफ्रेंडजवळ होता.पण त्याने तरुणीला सोडून पळ काढला ज्यामुळे चोरांना दया आली आणि त्याने तरुणीला बॅग पुन्हा दिली.

  काय  आहे प्रकरण ? व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि मुलगा रस्त्यावरून चालताना दिसत आहे. दरम्यान, मागून दुचाकीस्वार दोन चोरटे आले. दुचाकीस्वार तरुण मुला-मुलीच्या जवळ येताच त्यांनी धमकावून त्यांच्या मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉयफ्रेंड आपले दोन्ही हात वर करून थांबतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला तिथेच टाकून पळ काढतो. घाबरलेली तरुणी अखेर आपली हँडबॅग स्वत:हून दरोडेखोराकडे देते आणि पळून जाणाऱ्या बॉयफ्रेंडकडे बघत राहते. तिच्यासोबत असा प्रकार होताना पाहून चोरांनी तिची दया येते आणि ते अखेर तिची बॅग तिला परत करताता. त्यापैकी एक चोर तिच्या कानात बॉयफ्रेंडबद्दल काहीतरी सांगत असतो

हा व्हिडीओ @GarufaCapitan नावाच्या अकाउंटवरुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही घटना जवळच्या इमारतीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओला असंख्य लोकांनी पाहिलं आहे. लोक या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close