नांदगाव खंडेश्वर येथे, तालुक्यातील शिवसेनेची आढावा बैठक,

नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
दि 23/ 5/ 24 रोजी संपन्न झाली, बैठकीमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख यांनी अहोरात्र झटून शिवसेनेने गावागावामध्ये जो लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला खेचून आणण्यात यश प्राप्त केले, त्या अनुषंगाने तसेच *_गाव तेथे शाखा घराघरात शिवसैनिक_* असा पुढील संकल्प करण्यात आला आहे,
तसेच पुढील काही महिन्या नंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता रचना आखण्यात आली आहे, या बैठकीला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख बुथ प्रमुख शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीचे आयोजन शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद कोहळे यांनी केले होते.या बैठकीचे अध्यक्ष, अभिजीत पाटील ढेपे उपाध्यक्ष को-ऑपरेटिव बँक जिल्हा अमरावती, तसेच बाळासाहेब भागवत सह संपर्कप्रमुख,ओंकार ठाकरे माजी सभापती स्वराज ठाकरे युवा सेना जिल्हाप्रमुख. डॉ प्रमोद कठाडे, प्रभात पाटील ढेपे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, विलास पाटील सावदे उपसभापती,नाना हांडे संचालक ,प्रमोद पाटील ठाकरे कृषी संचालक बाळासाहेब रोहनेकर उपाध्यक्ष खरेदी विक्री , प्रकाश मारोटकर मा युवासेना जिल्हाप्रमुख , विनोद लवंगे, श्रीकृष्ण काकडे, पुंडलिक तरेकर, भूषण दुधे, प्रशांत काळे गजानन खोडे.धनंजय मेटकर संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती , रवी मुरादे, शिवाजी लाळे अजय केने सुहास चव्हाण असंख्य शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते,