सामाजिक

उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या पथनाट्याद्वारे जाणीव जागृती कार्यक्रम

Spread the love

 

कळंब  / प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील पार्डी या गावांमध्ये स्पेक्ट्रम कॉटफायबर एल. एल. पी. अंतर्गत दिनांक 14/02/2024 ला सायंकाळी उत्तम कापूस निर्मिती उपक्रम व मैत्री साधना फाउंडेशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य आयोजित केले. या पथनाट्यद्वारे सर्व शेतकऱ्यांना कपसी वरील शत्रू कीड व मित्र कीड यांची ओळख करून दिली. हानिकारक कीडनाशकांचा वापर कमी करणे, कीड दिसताच फवारणी न करणे, पिकाची पाहणी करूनच फवारणी करणे, वैयक्तिक सुरक्षात्मक साधनांचा वापर करणे, ठिंबक सिंचन, एक सरीआड पद्धतीचा अवलंब करून पाण्याचे व्यवस्थापन करणे, जैवविविधतेचे महत्व , बालमजुरी होऊ देऊ नये, समान काम समान वेतन, मिनीमम वेज, वय, लिंग, जात, धर्म, अशा गोष्टींवर भेदभाव न करून आपण सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे असा संदेश लोकांपुढे मांडत सहयोगी कलावंत ग्रुपचे डॉ. रामेश्वर व्हेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक वसाके, प्रतीक वाटकर, हर्षदा वसाके, तेजस मोहुर्ले, ईश्वरी येंडळे, गणेश भोंडवे यांनी पथनाट्य सादर केले.पियु व्यवस्थापक नरेश बाजरे यांनी BCI बाबत माहिती दिली व सर्वांचे आभार मानले.फिल्ड फॅसिलिटर प्रियंका ओंकार,नागसेन सुटे,वैभव मेघळ आणि कार्यक्रमला गावचे सरपंच अमित पिसे व गावातील प्रतिष्ठित नागरिक,कापूस उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close