सामाजिक
घाटंजी पोलिस स्टेशन येथे आषाढी एकादशी व बकरी ईदच्या निमित्ताने शांतता सभेचे आयोजन
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
घाटंजी- येत्या २९ तारीख ला महाराष्ट्र दैवत पंढरीच्या विठोबाच्या आषाढी एकादशीच्या उत्सव व बकरी ईद हे सन एकाच दिवशी येत असल्याने समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वधर्मीय शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेला घाटंजीतील तहसिलदार सेलोटकर व घाटंजी येथिल ठाणेदार सुषमा बाविस्कर मॅडम यांनी मार्गदर्शन करुन समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान केले. या प्रसंगी घाटंजीतील हिंदु मुस्लिम बांधव व पत्रकार बांधव बहूसंखेणी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1