कुंभारी येथे विरांगना राणी दुर्गावती पुतळ्यांचे अनावरण व बलिदान दिन साजरा
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या कुंभारी या गावात राणी दुर्गावती महिला मंडळाच्या व गावकर्यांच्या पुढाकाराणे राणी दुर्गावती यांच्या बलिदान दिनी त्यांचा आदर्श गावाकऱ्यांपूढे नेहमी राहावा या उद्दात हेतूने पुतळा अनावरण सोहळा कुंभारी येथे संपन्न झाला. यावेळी बलिदान दिनही साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून , बी आर एस पक्षाचे समन्वयक माजी आमदार राजूभाऊ तोडसाम,कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विनी ताई सलाम,माणिकराव मेश्राम, नारायण भोयर, पिटू उगले रमेश धूर्वे सदाशिव बाडे विनय जाधव बंडू तोडसाम,सूरज जाधव गजानन ठाकरे,सरपंच दुर्गा प्रकाश उगले उपसरपंच सुनंदा विनोद सलाम व सुगंधा माणिक मडावी जयवंताबाई मेश्राम द्वारकाबाई मेश्राम विठ्ठल किनाके वसंतराव सोयाम,विनोद सलाम व समस्त गावकरी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना बि आर एस पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी महिलांनी राणी दुर्गावती यांचा आदर्श घेऊन समाजासाठी आणि देशासाठी कार्य करण्याचं आव्हान महिलांना केले. त्यासाठी समाजातील पुरुषांनी तेवढ्याच तत्परतेने महिलांना साथ द्यावी असे आपल्या भाषणातून त्यांणी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी आणि गावकर्यांनी बि आर एस पक्षाचे माजी आमदार राजूभाऊ तोडसाम आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केलं यावेळी गावातील महिला आणि पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. स्थाईक कार्यक्रम नंतर विरांगणा राणी दुर्गावती यांची गावातून मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील महिला पुरुष आणि युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कोवे यांनी केले तर आभार अश्विनी सलाम यांनी मानले.