जिल्ह्यात बरसला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या आंब्याला बसला फटका
अरविंद वानखेडे
यवतमाळ
उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना सूर्य आग ओकतोय. गर्मीने नागरिक पुरते हैराण झाले आहे.असे असताना यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस आलाय. जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.या पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्यापासून 40 अंश सेलसियसच्या समोर पोहचलेला असताना आज संध्याकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या अवकाळी पाऊसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बारसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने यवतमाळकरांना दिलासा मिळाला.पावसाचे कोणतेही लक्षण नव्हते मात्र विजेच्या कड -कडाटासह अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे.या पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.