क्राइम

विहिरीत पोत्यात सापडलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलले

Spread the love
व्यावसायिक स्पर्धेतून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड
जुन्नर / प्रतिनिधी
             जुन्नर तालुक्यातील बेल्व्हे येथील विहिरीत पोत्यात आढळलेल्यात्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. ती हत्या व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. किशोर तांबे यांच्या डोक्यात रॉड घालून त्याची हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
किशोर तांबे  हे बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते. या प्रकरणात पोलिसांनी पांडुरंग जिजाबा तांबे (वय ३९ वर्ष) व महेश गोरकनाथ कसाळ (वय ३० वर्ष) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत किशोर तांबे हरवल्याची तक्रार चुलत भाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिली होती
आरोपी पांडुरंग तांबे याने मित्राच्या मदतीने किशोर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यातच तांबे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुरावे गायब करण्यासाठी आरोपींनी तो मृतदेह पोत्यात भरला आणि तो पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात दगड भरले. हा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परिसराची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना मृतदेह तिथून जवळच असलेल्या विहिरीत आढळला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनीच खून केल्याचे यात समोर आले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close