क्राइम
अज्ञात चोरट्यांकडुन दुकानात चोरी
१ लक्ष १९ हजार रूपायांचा मुद्देमाल लंपास.
वरूड/ तुषार अकर्ते
वरूड शहरातील पांढुर्णा चौक परिसरातील डॉ.प्रविण चौधरी यांचा हॉस्पिटल समोरील कॉस्मोटीक विक्रेता चंदन अशोकराव भागवत यांच्या मालकीचे चंदन ब्रदर्स कॉस्मोटीक एजन्सी दुकानाचे मध्यरात्री दरम्यान कुण्यातरी अज्ञात चोरट्याने लोखंडी शटर मध्यभागी वाकवून दुकानाच्या आत प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यातील नगद रोखरकमेसह १ लक्ष ९७ हजार रुपायांचा दुकानातील माल चोरून नेला आहे.या बाबत चंदन भागवत यांनी दि.१९ जुलै रोज बुधवारला पोलिसांत तक्रार दाखल केली असुन या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1