अनोख्या कलाकाराची अनोखी कला
जळगाव / प्रतिनिधी
जळगाव येथील मानव सेवा विद्यालय कलाशिक्षक, उपक्रम शिक्षक, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपल्या खोजल्यातून भारताचे यशस्वी उद्योजक भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारानी सन्मानित तसेच टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची मिठापासून चित्र तयार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या कलेच्या माध्यमातून सुनिल दाभाडे यांनी वाहिली आहे.
रतन टाटा यांनी आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. सोबत जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. ज्या ज्या वेळी भारतावर नैसर्गिक अपत्ती आली आहे त्या त्या वेळेस रतनजी टाटा हे भारतासाठी मदत करण्यासाठी सगळ्यात पुढे आलेले आहे जसे भूकंप असेल कोरोना असेल अनेक अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी भारताला सहकार्य केले आहे रतन टाटा यांनी कोरस,जग्वार, टेटली सारख्या जगातील नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली.’ मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ‘ हा त्यांचा स्वभाव होता.याच स्वप्नामधुन इंडिगो आणि नॅनोची निर्मिती करुन कुठलीच गोष्ट अशक्य नाही .हे टाटानी सिध्द केलं आहे. तसेच
ज्यांनी संपूर्ण भारतातील प्रत्येक घरात ‘ देश का नमक टाटा नमक’ हे ब्रिज वाक्य चा वापर करून प्रत्येकाच्या घरात टाटा मीठ पोचवले त्याच टाटा मिठाचा वापर करून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी भारतरत्न उद्योगपती रतन टाटा यांची मिठापासून सुरेख अशी प्रतिमा तयार करण्यात आली आहे .
सुनिल दाभाडे हे नेहमीच आपल्या कलेतून वेगवेगळे प्रयोग करत असतात आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा वेगवेगळे साहित्यांचा वापर केलेला आहे जसे, विटेवरी विठुरायांचे चित्र ,तव्यावरील बहिणाबाई चौधरींच्या चित्र, पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र मेहरूणचा बोरांपासून श्रीरामाचे चित्र अशा अनेक वेगवेगळे प्रयोग करून चित्रकार सुनिल दाभाडे हे नेहमीच वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून चित्र काढत असतात आजही त्यांनी मिठापासून हा नवीन प्रयोग केलेला आहे त्यांना वाटतं की मिठापासून हे जगातले पहिले चित्र असू शकतो .आतापर्यंत मिठाचा वापर करून कोणीही चित्र काढलेले नाही अशा अनोख्या चित्रकाराची अनोखी कला . मिठा पासून चित्र तयार करण्यासाठी 24 मिनिट लागले.तसेच मिठ पाव किलो ,फेमिकाल, पोस्टर कलर व केसरी व हिरवा रंगाची रांगोळी चा वापर केला आहे. चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपल्या कलेचा माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही देव नाही पाहिला, पण टाटा पाहिला, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा आपल्यातून देव माणूस हरपला.