गोदावरी अर्बन ने अतिशय परिश्रम घेत यशस्वी 10″वर्ष पूर्ण
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
गोदावरी अर्बन घाटंजी शाखेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.हेमंतभाऊ पाटील साहेब,अध्यक्षा सौ.राजश्रीताई पाटील मॅडम,व्यवस्थापकीय संचालक श्री.धनंजय तांबेकर सर,सर्व सन्मानीय संचालक, चिफ मॅनेजर सौ.सुरेखा दवे मॅडम, प्रिन्सिपल मॅनेजर,विजय शिरमेवार, सिनियर मॅनेजर रवी इंगळे,मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे,यांच्या मार्गदर्शना खालील उपक्रम राबविण्यात आले . गावातील परिसरात वृक्षारोपण, करून गरजु नागरिकांना पावसापासून स्वक्षणा करिता रेनकोट वाटप,व संस्थेच्या ठेवी व लोन विषयी परिसरातील दुकानात जाऊन मार्केटिंग करण्यात आली.तसेच शाखेच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.चित्रकला स्पर्धेचे आयोजन हे श्री. समर्थ विद्यालयात दिनांक १० /७/२०२३ रोज सोमवार ला गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटी शाखा घाटंजीच्या सौजन्याने वर्ग ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या चित्रकला स्पर्धेच्या कार्यक्रमा निमित्त गोदावरी अर्बन क्रेडिट- सोसायटी शाखा घाटंजीच्या व्यवस्थापक सौ.शैला गंपावार,चेतन पटेलिया,निलेश होनाडे,अंकित गुरनुले,शुभांगी पुराणिक,श्वेता कवासे, सचिन येन्नरवार, निखील वझलवार ,उपस्थित होते.श्री समर्थ विद्यालयाचे अध्यक्ष मधुसूदन चोपडे,मुख्याध्यापक, देवदत्त जकाते,पर्यवेक्षक अमोल वैद्य,शिक्षक राजू गोरे,संदीप दिडशे,उपस्थित होते.या चित्रकला स्पर्धेत विद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवीला. स्पर्धेकरिता विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.या सर्व सामाजिक उपक्रमातून दशक पूर्वी सोहळा शाखेच्या वतीने संपन्न झाला.