Uncategorized

दुर्दैवच आणखी काय ? मृतदेह घेऊन जाणाऱ्या Ambulans चा अपघात कुटुंबातील चार सदस्य ठार

Spread the love

 कानपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क

               म्हणतात न की माणसाचे नशीब खराब असतील तर त्याच्या ओबात काहीही घडू शकते. असाच प्रकार एका कुटुंबासोबत घडला आहे. पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याने आई आणि तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. कुटुंबासाठी ही वेदना मोठी होती. इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि आईसह तिच्या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला. चौथ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

28 जुलै रोजी सकाळी कुटुंबीय रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन त्यांच्या गावी जात होते. “पहाटे 4:30 च्या सुमारास पूर्वा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ही घटना पूर्वा कोतवाली भागातील तुसरौर गावाजवळ घडली. प्रदीर्घ आजारामुळे मैरावान येथील रहिवासी धनीराम सविता यांच्यावर कानपूरमध्ये उपचार सुरु होते, आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन नातेवाईक गावी परतत होते. नुकतीच मारुती व्हॅन रुग्णवाहिका तुसरौर व गावाजवळील पूर्वा कोतवाली परिसरात आली. यादरम्यान रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने धडक दिली.

कानपूरहून अॅम्ब्युलन्स येत होती ज्यात धनीरामचा मृतदेह घेऊन जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. सीओ पुढे म्हणाले की या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास केला जात आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशी शेखर सिंहही घटनास्थळी होते. जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close