पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत आभा कार्ड नोंदणी नेर शहरात सुरू,जनतेनी लाभ घ्यावा
मानवाधिकार फेडरेशनच्या वतीने आव्हान.
नेर :- नवनाथ दरोई
नेर शहरातील विविध प्रभागात गेल्या महिन्यांपासून पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी सुरू आहे.आज नेर शहरातील नबाबपुरा येथील मंदिरात आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी सुरू करण्यात आली .
आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड(आभा) च्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा ५ लाख विमा जनसामान्यांच्या आरोग्य विषयक समस्या करीता लागु होईल तर आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड मध्ये विविध रोगांवर ५लाख रुपये पर्यंत मोफत इलाज होईल आणि या करीता यवतमाळ शहरातील खासगी व सरकारी ३० दवाखान्यात मोफत इलाज होईल.नेर शहरातील नागरिकांच्या आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी करीता नेर शहरातील विविध भागात सी एस सी प्रमुख संतोषकुमार गोलाराम पटेल, ब्रिजेश तुलसीदास पटेल, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनच्या मार्गदर्शक इरफान मलनस, रेणुका बिहारी लाला जयस्वाल, सपना भरुड यांची टीम २ महिन्यांपासून रोज अंदाजे २०० आभा कार्ड नोंदणी करीत आहे. तरी नेर शहरातील नागरिकांनी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड (आभा) नोंदणी करण्याकरीता, नेर शहरातील आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड सी एस सी सोबत संपर्क साधावा.असे आव्हान मानवाधिकार फेडरेशन केले.