ब्रेकिंग न्यूज

अनियंत्रित वाहन झोपडीवर चढले ; मेळघाट मधील तीन मजुरांचा दुर्देवी मृत्यू

Spread the love
मलकापूर / प्रतिनिधी
                   अनियांत्रित वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीवर चढल्याने त्यात झोपलेल्या तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिखलदरा तालुक्यातील घटनामोरघड येथील हे मजूर असल्याचे कळते. ही घटना सकाळी 5.30 वा राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर घडली.
         मिळालेल्या माहिती नुसार चिखलदरा तालुक्यातील घटनामोरघड येथील 10 मजूर रस्त्यावर काम करण्यासाठी नांदुरा येथे गेले होते. ते महामार्गाला लगत झोपडी बांधून राहत होते. आज सकाळी  5.30 वा चे दरम्यान PB-11 / CZ 4047 या आयशर वाहनांच्या चालकाने बेतरकार पणे गाडी चालवित वडणेर भुलजी MH-6 गावाजवळ मजुरांच्या झोपडीवर गाडी चालवित अपघात घडवला या अपघातात झोपडीत झोपलेल्या 10 मजुरांपैकी 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
१) प्रकाश बाबु जांभेकर २६ वर्ष, २) पंकज तुळशीराम जांभेकर यांचा जागीच मृत्यू झाला., ३) अभिषेक रमेश जांभेकर १८ वर्ष याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला., १) दिपक खोजी बेलसरे २५ वर्ष, २) राजा दादु जांभेकर ३५ वर्षयांचेवर मलकापूर येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल  यांनी बुलढाणा येथे सम्पर्क करून माहिती जाणून घेतली अपघात ग्रस्तांना मदत कार्य सुरू
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close