सामाजिक

अडाण नदीत वाहणा-या इसमास बचाव पथकाच्या शर्थीचे प्रयत्नाने मिळाले जीवनदान.

Spread the love

घाटंजी ता.प्र.  – सचिन कर्णेवार

यंदा पावसाचा सपाटा सूरू झाला व नद्या दूथडी तुडूंब वाहू लागल्या अशात पोटापाण्यासाठी मच्छ व्यवसाय करून उदर भरण करतांना घाटंजी तालुक्यातील कापशी कोपरी जवळून वाहत जात असलेल्या अडाण नदीत कोपरी येथिल भाऊराव सातघरे वय अं.५८ वर्ष हे काल दिनांक १५ जुलै शनिवारला अडाण नदीच्या पात्रातील इशोर जवळ मासे पकडण्यासाठी गेले असतानाच प्रथम चर्चेकडून समजते अश्यातच अचानक नदीला पूर आल्याने ते नदीत अडकले पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे त्यांना पात्रातून बाहेरयेते आले नाही. खूप रात्र होवूनही भाऊराव सातघरे घरी न आल्याने घरच्या मंडळीची चिंता वाढली त्यांनी अडाण नदी गाठली तोच भाऊराव सातघरे यांचे कपडे नदी काठावर दिसून आले. उपस्थितांनी भाऊरावला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहाने त्यांना आवाज पोहचले नाही. या मंडळींनी गाव गाठत पोलीस पाटील निलावार यांना घटनेची माहिती दिली लगेच त्यांनी घोटी महसूल मंडळ अधिकारी टापरे यांना माहिती दिली.सदर घटनेची गांभीर्य ओळखून त्वरित तहसीलदार यांना माहिती देण्यात आली.कर्तव्यावरील तहसिलदारांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निवारणशी संपर्क करून त्यांना प्राचारण केले. पूर आपत्ती व्यवस्थापन टीमणे घटना स्थळ गाठुन शोध मोहीम सुरू केली मात्र रात्रीची वेळ आणि नदीचा प्रवाह यात भाऊराव यांना रातआंधळे पणा असल्याने संपर्क होवू शकत नव्हता. बचाव पथकाची रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत शर्तीचे प्रयत्न चालू होते मात्र भावरावचा कूठे थांगपत्ता लागत नाही. परत आज रविवारला सकाळ होताच बचाव पथकाने आपल्या कार्यास सुरुवात केली.यात भाऊराव सातघरे उंच जागेचा आसरा घेत भेदरलेल्या अवस्थेत जीव मुठीत घेवून असल्याचे आढळले. बचाव पथकाने बोटीच्या साह्याने त्यांना बाहेर काढले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close