शिवशाही बसच्या धडकेने शेतमजूर महिला ठार
नांदगाव खंडेश्वर:
पवन ठाकरे
अमरावती यवतमाळ महामार्गावर फुबगाव फाट्या नजीक शिवशाही बसच्या धडकेने शेतात शेतमजुरीच्या कामासाठी जाणाऱ्या सौ.सुशीला शामराव मेश्राम व 58 वर्षे राहणार पहूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रविवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली.
पहुर येथील महिला या सकाळी आठ वाजता च्या सुमारास शेलू नटवा येथील शेतामध्ये शेतमजुरीच्या कामासाठी जात असताना या महिलेला शिवशाही बस क्रमांक एम एच 09 14 72 ते चालक विनायक दामोदर सावरकर यांनी निष्काळजीपणे बस चालून सदर महिलेला धडक दिली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 333/2023 कलम क्रमांक 279,304 अभादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाची फिर्याद सतीश शामराव मेश्राम राहणार पहूर यांनी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विशाल पोळकर यांच्या मार्गदर्शनात नांदगाव खंडेश्वर पोलीस करीत आहेत.