क्राइम

आठवी पास तरुणाने 10 महिला कॉन्स्टेबलाना बनवले मूर्ख 

Spread the love
शारीरिक  संबंध ठेवत कोट्यवधीचा लावला चुना 
बरेली (युपी) ) नवप्रहार डेस्क 
                तो फक्त आठवी पास , पण त्याचे डोके कमालीचे चालायचे. पोलिसांसोबत राहून राहून त्याने त्यांच्या सारखे बोलणे ,वागणे , यासह इतर बाबी शिकून घेतल्या होत्या. इतकेच काय तर शस्त्र कसे पकडायचे हे देखील त्याला अवगत झाले होते. आणि याच गोष्टीचा गैरफायदा उचलत त्याने 10, महिला पोलिस कर्मचाऱ्यांना मूर्ख बनवत कोट्यवधी रुपयांनी लुबाडले.

तो दिवसभर यूपी पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर डोळे लावून बसायचा. त्याने करोडो रुपये कमावले आणि विलासी आयुष्य जगला. या खुलाशामुळे पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

राजन वर्मा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तो फक्त आठवी पास आहे. नोकरी नसल्यामुळे तो पोलिसांसोबत राहू लागला आणि त्यांची जीवनशैली शिकून घेतली. पोलिसांसोबत राहताना गणवेश कसा घालायचा, सॅल्युट कसा करायचा, शस्त्रे कशी धरायची, या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती त्यांनी गोळा केली.
त्यानंतर त्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न केले. महिला पोलीस कर्मचाऱ्याला सत्य समजल्यावर लग्न मोडलं. त्यानंतर त्याने पुन्हा इतर महिला पोलिसांसोबत तेच करायला सुरुवात केली. बरेली येथील एका पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, प्लॉटसाठी कर्जाची कागदपत्रे घेतल्यानंतर राजनने फसवणूक करून कार मिळवली. तिच्या खात्यातून पैसे कापले जाऊ लागल्यावर या बोगस पोलिसाचा पर्दाफाश झाला
पोलिसांचा गणवेश परिधान करून लग्नाच्या बहाण्याने त्याने  आतापर्यंत डझनभर महिला कॉन्स्टेबलना आपली शिकार बनवली. एवढंच नाही तर या सर्व महिला कॉन्स्टेबलची त्याने दोन कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. लखनौहून त्याच्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्याने महिला पोलिसांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डही मिळवले आणि त्यांना बँकेकडून कर्ज मिळवून दिले.
त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला. बरेली पोलिसांनी आरोपीला सॅटेलाइट बस स्टँड येथून अटक केली आहे.  एसपी सिटी राहुल भाटी यांनी सांगितलं की, आरोपीने प्रामुख्याने महिला पोलिसांनाच लक्ष्य केलं. पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरून महिला पोलिसांचा डेटा काढायचा. महिला पोलीस कुठे तैनात आहेत हे पाहायचा. तो पोलीस असल्याची बतावणी करून पोलिसांचा गणवेश घातलेले फोटो पाठवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवत असे. आरोपीने आपल्या जबानीत आतापर्यंत 8-10 घटनांची कबुली दिली आहे. त्याच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close