उमरखेड येथील आंदोलन कर्त्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
उमरखेड / प्रतिनिधी
दिनांक 5 सप्टेंबर पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उमरखेड तहसील प्रांगणात पाच जणांचे बेमुदत उपोषण सुरू आहे अशातच काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपार1.30 सुमारास जेवली या गावचा युवक उपोषण स्थळी आला व विष प्राशन केले यानंतर येथील उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली युवकाला तातडीने उपचार महिन्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले प्रकृती असे अतिशय चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले
जेवली गावातील अशोक देवराव जाधव(35) असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे सध्या अशोक जाधव हा मृत्यूशी झुंज देत असून यावेळी डी वाय एस पी प्रदीप पाडवी ठाणेदार शंकर पांचाळ तसेच उपनिरीक्षक सतीश खेडकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आहे अशोक जाधव याला सध्या पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अनेक गावांमध्ये घटनेचे पडसाद उमटले असून खेड्यापाड्यातील लोकांनी शासनाचा जाहीर निषेध केला असून अनेक ठिकाणी रस्ता रोको सुद्धा करण्यात आलेला आहे अनेक मराठा समाज आरक्षणास पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसत आहे