उद्या श्री रामदेव बाबा माघ मेला उत्सव

धामणगाव रेल्वे,
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री कृष्णावतार भगवान श्री रामदेव बाबा माघ मेला (यात्रा) उत्सव माघ शुद्ध एकादशी, आज शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. या मंगल प्रसंगी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत आस्था व संस्कार टीव्हीवरील प्रसिद्ध गायक दिनेश शर्मा यांच्या स्वरांनी रामदेव बाबांच्या जीवनावर आधारित जम्मा जागरण व भजन संध्या होणार आहे. श्री रामदेव बाबा ट्रस्टने भक्तगणांनी मोठ्या संख्येने मेळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
घरगुती उपयोगी वस्तूंचे विक्री ……
उत्सवाच्या दरम्यान मंदिर परिसर ते अमर शहीद भगतसिंग चौकापर्यंत मोठी यात्रा भरणार आहे. या ठिकाणी बाहेरगावाहून आलेले दुकानदार घरगुती उपयोगी वस्तूंची विक्री करतील. मेळ्यात धार्मिक पुस्तके, घरगुती साहित्य, चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच विविध वस्तूंची खरेदी करता येईल.