क्राइमहटके

महिला पोहचली ठाण्यात आणि आयटी हब बेंगरुळू मध्ये उघड झाला वाईफ स्वॅपिंग चा प्रकार 

Spread the love

बेंगळुरू / नवप्रहार डेस्क 

                        पती पत्नीचं नातं एक वेगळं असतं. या नात्याचे मान – सन्मान , प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी ही दोघांचीही असते. पण झपाट्याने बदलत चाललेल्या जगात हे नातं आणि नात्यातील जबाबदाऱ्या देखील बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे.आता नवीन जोडपे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना दिसत आहे. सध्या नात्यांसंदर्भातील एक हादरवणारं वृत्त समोर आलं असून, त्यामुळं पुन्हा एकदा जग नेमकं कोणत्या मार्गावर जात आहे हाच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

कर्नाटकची राजधानी असणाऱ्या आणि भारतातील कॉर्पोरेट, आयटी हब अशी ओळख असणाऱ्या बंगळुरू इथं ‘पार्टनर स्वॅप क्लब’चा भांडाफोड होऊन swingers नावे जोडीदार अदलाबदलीचं हे रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथं आरोपी इसम जोडप्यांना शरीरसुखासाठी त्यांचे जोडीदार बदलण्यासाठी प्रवृत्त करत. यानंतर बळजबरीनं महिलांचं लैंगिक शोषण केलं जात, अशीही खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

बंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपास आणि कारवाईदरम्यान हरीश आणि हेमंत नामक दोन तरुणांना अटक करण्यात आली. ज्यानंतर हे दोघंही खासगी पार्ट्यांच्या निमित्तानं ‘गर्लफ्रेंड/ पार्टनर स्वॅपिंग’चं रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली.

कशी लागली कुणकुण?

रॅकेटमधीलच एका पीडित महिलेनं सीसीबी म्हणजेच गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सूत्र चालली. आपल्यावर जोडीदार बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती या महिलेनं पोलिसांना दिली आणि तातडीनं पुढील कारवाईला वेग मिळताच हे रॅकेट उघड झालं.

कसं चालवलं जात होतं हे रॅकेट?

आरोपी बंगळुरूनजीकच असणआऱ्या काही भागांमध्ये खासगी पार्ट्यांचं आयोजन करत होते. यासाठी ते व्हॉट्सअप ग्रुप तयार करून याच माध्यमातून इतरांशी संपर्क साधत. या पार्ट्या फक्त दिखाव्याचं एक निमित्त होत्या.

ओळखीच्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध…

पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर आरोपी आणि तिच्याच ओळखीतील काहीजणांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी सातत्यानं दबाव टाकला जात होता. महत्त्वाची बाब म्हणजे पीडित महिला आरोपींपैकी एकासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि हा इसम तिच्याप्रमाणच इतरही काही महिलांसोबत रिलेशनशिरमध्ये असल्याचा बनाव रचत त्यांना ब्लॅकमेल करत होता.

जेव्हा पीडितेनं इतरांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा आरोपीनं तिला काही ‘छायाचित्रां’वरून धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ज्यावेळी सविस्तर माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा हे सराईत गुन्हेगार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली.

तपासातून याप्रकरणी अनेक धागेदोरे समोर आले ज्यामध्ये अनेक महिलांची अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओसुद्धा आढळली. आरोपींकडून या व्हिडीओ आणि फोटोंचा वापर महिलांवर दबाव टाकण्यासाठी आणि त्यांना धमकावण्यासाठी केला जात होता. आतापर्यंत त्यांनी यामध्ये एकूण किती महिलांची फसवणूक केली आणि कितीजणींना धमकावलं याचाच तपास आता पोलीस घेत असून, या रॅकेटसंदर्भात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close