त्या पोटट्याने चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असे कृत्य करुन केली प्रेयसो सोबत आत्महत्या

चंपारण / नवप्रहार ब्युरो
या इंटरनेट च्या युगात प्रेम हा फार स्वस्त विषय झाला आहे. फेसबुक, इंस्टा, व्हाटस अप च्या नादी लागलेली तरुणाई वाम मार्गाला लागली आहे. काय म्हातारे , काय तरुण आणि काय अल्पवयीन मुले सगळेच प्रेमात पडले आहेत. त्यामुळे अनैतिक संबंधात देखील प्रचंड वाढ झाली आहे. आणि या कारणाने क्राईम रेट सुद्धा वाढला आहे. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुलांनी जे कृत्य केले ते एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशे असेच म्हणावे लागेल. चला तर जाणून घेऊ काय आहे प्रकरण
बिहार राज्यातल्या पूर्व चंपारण जिल्ह्यातल्या खोडा गावातल्या चिरैया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यातला प्रियकर इयत्ता दहावीत शिकत होता, तर त्याची प्रेयसी इयत्ता नववीत शिकत होती. गेल्या वर्षभरापासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं; मात्र दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या या प्रेमप्रकरणाला विरोध केला होता. त्यामुळे त्या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
चिरैया पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमला पाठवले. सिकरहना डीएसपी अशोक कुमार यांनी सांगितलं, की प्राथमिक तपासामध्ये तरी ही आत्महत्येची घटना वाटत आहे. या घटनेचा बारकाईने तपास केला जात आहे. अद्याप प्रियकर आणि प्रेयसी या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबीयांकडून काहीही अर्ज आलेला नाही.
मृत मुलाचं वय 16 वर्षं होतं, तर मुलीचं वय 15 वर्षं होतं. ती दोघंही एकाच शाळेत शिकत होती. शिकताना त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. गावाच्या दक्षिण दिशेला असलेल्या आंब्याच्या एका झाडाला लटकून त्यांनी गळफास घेतला. मरण्याआधी प्रियकराने एखाद्या चित्रपटात शोभेल असं कृत्य केलं. प्रियकराने आपलं बोट कापून आपलं रक्त कुंकूप्रमाणे प्रेयसीच्या भांगात लावलं. त्यानंतर त्याने 112 नंबर डायल करून पोलिसांना आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि नंतर दोघांनी जीव दिला. त्यांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने बागांमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली; मात्र पोलीस पोहोचेपर्यंत त्या दोघांचे प्राण गेले होते.