Uncategorized
त्या छोट्याशा लव्ह स्टोरीचा दि एंड

अलिगड / नवप्रहार डेस्क
येथील सासू आणि जावयाची लव्ह स्टोरी देशभर चर्चेत होती. सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याने ‘ ये रिश्ता क्या कहलाता है ‘ या चर्चेला उद्यान आले होते. आता या छोट्याशा लव्ह स्टोरीचा दि एंड झला आहे. पोलिसानी या दोघांना नेपाळ सीमेवरून अटक केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, सासूने रडत-रडत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.पोलीसांनी या जोडीला शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. ते सापडत नव्हते. अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतले आहे. आता त्यांना अलिगडला आणण्यात येणार आहे.
महिलेनं केला असा खुलासा –
माध्यमांतील वृत्तानुसार, चौकशीदरम्यान सपना म्हणाली, आपला नवरा दारू पिऊन आपल्याला नेहमी मारहाण करत होता. मुलीचे लग्न राहुलशी ठरल्यानंतर, जेव्हा जेव्हा राहुलचा फोन यायचा, तेव्हा आपण राहुलसोबत बोलायचो, यावरून आपली मुलगीही वेगवेगळे आरोप करत असे. पतीही शिवीगाळ करत असे आणि राहुलसोबत पळून जाण्याची धमकी देत असे. यामुळे आपण राहूल सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तीने, आपल्याला मडराक पोलीस ठाण्यात नेऊ नये, आपल्याला दादों पोलीस ठाण्याची मदत मिळावी आहे, अशी विनंतीही पोलीस अधिकाऱ्यांना केली असेल्यचे एसपी ग्रामीण अमृत जैन यांनी सांगितले.
कसा कसा केला प्रवास? –
दरम्यान, प्रियकर राहुलची चौकशी केली असता, “सपना एप्रिलमध्ये अलीगढहून कासगंजला आली, यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बरेलीला पोहोचलो. यानंतर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोहोचलो. तेथे मी माझा मोबाईल बघितला, तर सोशल मीडियावर आमचीच चर्चा सुरू होती. हे लक्षात घेत आम्ही झफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. तेथून बसने आलो आणि राया कट येथे उतरलो आणि तेथून गाडी भाड्याने घेऊन पोलीस ठाण्यात आलो.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |