क्राइम

त्या 18 वर्षीय तरुणीच्या हत्येमागील कारण आले समोर 

Spread the love
पिंपरी /चिंचवड – नवप्रहार ब्युरो
           काल रात्रीच्या सुमारास कोमल जाधव नावाच्या 18 वर्षीय तरुणीची दोन दुचाकी स्वारांनी भर चौकात धारदार शस्त्राने वार करत हत्या केली होती. भरचौकात घडलेल्या या हत्येने खळबळ माजली होती. तरुणीच्या हत्ये मागे काय कारण आहे याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी आरोपींना पकडले असून हत्येचे कारण समोर आले आहे.
                         पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार उदयभान यादव हा कोमल जाधव हिच्या बाजूला राहत असल्याने त्याच्यात बोलचाल होती. काही वेळा उदयभान याने तरुणीची आर्थिक मदतही केली होती. उदयभान कोमलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण कोमल मी त्याला झिडकारले होते. त्याचा राग उदयभान च्या मनात होता. आणि तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.
                   संतापलेल्या उदयभान ने आपल्या सख्ख्या भाच्याला आपल्या कटात सामील करून घेतले.या दोघांनी कोमलचा पाठलाग केला . त्यानंतर तिला विल्हेकरवाडी येथे गाठले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने खून केला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close